चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:-हंडरगुळी ग्रा.पं.चे प्रभारी तथा माजी सरपंच विजय अंबेकर यांचा ५ वर्षाचा सत्ताकाळ जनतेच्या *लाॅंग टाईम* स्मरणात राहील असा गेला.
आणि गत कांही दिवसा - पासून ग्रा.पं.मध्ये सरपंच व उपसरपंच हे पद नाही. कारण,पंचवार्षीक मुदत संपली आणि शासनादेशाने प्रशासक राज आले.
आणि विजयकुमार अंबेकर हे यात प्रभारी झाले.आणि त्यांनी ग्राम विकासाधिकारी एस.आर.कांबळे,पाणी पुरवठा कर्मचारी सचीन माचेवाड,नंदु भालेराव, अक्षय माने यांच्या सहकार्याने व नियोजनाने या वर्षी ऐन उन्हाळ्यात हंडरगुळीकरांना पाणी टंचाई जाणवणार नाही. यासाठी मेहनत घेतली. आणि काळ्याउन्हात ही एक दिवसआड नळ तेथे भरपुर जल पुरवठा केला. तसेच अनेक वार्डात असलेल्या मिनी वाटर टॅंक मध्ये पिण्याचे पाणी रोज न चुकता सोडले.अशा प्रकारे यंदा कडक उन्हाळाभर प्रभारीमुळे भरपुर पाणी मिळाले.
अशी चर्चा हंडरगुळीत होत असून प्रभारीमुळे पाणी आले घरोघरी.असे म्हणणे चुक ठरु नये.


0 टिप्पण्या