मंगेश मेश्राम यांनी तक्रारीच्या अनुषंगाने केली चौकशीची मागणी
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-लाखनी तालुक्याच्या ग्रामीण परिसरात सूरू असलेल्या मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्याचे ७०० मीटर लांबी रस्त्याचे मजबुतीकरण, खडीकरण करण्याचे काम सुरू आहे.
हे काम अंदाजे २२ लक्ष रुपये किमतीचे आहे.मात्र,करण्यात येत असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक देवरी येथील सामाजिक कार्यकर्ता मंगेश मेश्राम यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
सदर रस्ता बांधकाम सुरु असताना उखळणे सुरु झाल्यामुळे शासनाच्या फंडाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने दुरुपयोग होत आहे.
बांधकाम त्वरीत थांबवून या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजनेच्या या पाणंद रस्ता कामाची सुरुवात भंडाराचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते मागील पंधरवड्यात झाली.कामाला प्रत्यक्षात सुरुवात मागील आठवड्यात झालेले असून सुरुवातीपासूनच या कामामध्ये साहित्याचा वापर हा अत्यंत सुमार दर्जाचा असल्यामुळे गावकऱ्यांनी या कामाला विरोधसुद्धा केला. ठेकेदारांने गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता विभागातील अधिकारी यांना हाताशी धरून काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी अधिक वेगळे परंतु तरीही निकृष्ट अशा कामांची त्वरीत चौकशी होणे गरजेचे आहे.कंत्राटदारांच्या
हातमिळवणीमुळे व अशाच वृत्तीमुळे संपुर्ण लाखनी तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे.
यासाठीच हे मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजनेचे काम त्वरित बंद करून कामाची चौकशी करून दोशिंवर व कुशल काम करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी देवरी येथील सामाजिक कार्यकर्ता मंगेश मेश्राम यांनी केली आहे.


0 टिप्पण्या