Ticker

6/recent/ticker-posts

प्रशासनाचा आंधळा कारभार,दिव्यांगांना तीन महिन्यांपासून मानधन मिळाले नाही,

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड -:दिव्यांग, वृद्ध, निराधार, लोकांना शासनाने संजय गांधी निराधार योजना,, श्रावणबाळ योजना, सुरू केली दिव्यांगांना 2500,रु दिव्यांग पेन्शन दिले जाते वृद्ध, विधवा, निराधार लोकांना 1500,रु दिले जातात आज तीन महिन्यांपासून त्यांना मानधन बर्याच लाभार्थीना मिळाले नाही, यामध्ये दोष कोणाचा हेच कळेना झाले,K,Y,C, करा असे सांगितले दिव्यांगांनी के,वाय,सी, केली तरी मानधन मिळाले नाही, नंतर हे प्रशासकिय अधिकारी D,B,T,करण्यास सांगितले ते पण् दिव्यांगानी केले तहसील कार्यालयात जाऊन, तरी मानधन बेपत्ता 
ऊन्हात तान्हात जाऊन दिव्यांग, तहसील कार्यालयात चौकशी करत आहेत, त्यांना एक च उत्तर वरून डायरेक तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे त, येतील वाट पाहा, प्रहार दिव्यांग नांदेड जिल्हा शहर अध्यक्ष, यांनी प्रहार स्टाईल ने चौकशी केली असता, आमच्या कडून दिव्यांग पेन्शन पाठवले बाॅंक व पोस्ट खात्यात पैसे पाठवले, तिथं चौकशी करावी,तीथे जाऊन चौकशी केली ते सांगतात आमच्या कडे पैसे जमा झाले नाही,असा प्रशासनाचा आंधळा कारभार सुरू आहे, तहसीलदार सांगतात पैसे इथून पाठवले बाॅंक व पोस्ट अधिकारी सांगतात जमा झाले च नाही,तर हे दोघांच्या मध्ये कुठं दिव्यांग, वृद्ध, विधवा, निराधार लोकांचें पेन्शन अडकले याची चौकशी करायचे काम कोणाचे,असा प्रश्न निराधार,दिव्यांग,बंधु, भगिनींना पडला आहे, तीनं महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने दिव्यांगाचे काय हाल होत आहेत,ते प्रशासनाला कसे कळणार दिव्यांग हा दुर्बल घटक, आर्थिक कमाई जेमतेम औषध पाण्यावर अवलंबून असणारा,जर त्याला वेळेवर मानधन च मिळतं नसेल जगणार कसा 
एक तर तुटपुंजे मानधन,ते पण वेळेवर मिळत नाही,तरी प्रशासनाने याचा विचार करावा काही दिव्यांग व वृद्ध लाभार्थीना मानधन मिळाले व बर्याच लाभार्थीना मानधन मिळाले नाही,याची त्वरित चौकशी करावी मा, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी,किरण आंबेकर साहेब यांनी जे दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी प्रहार दिव्यांग 
संगठन जिल्हा नांदेड यांच्या 
वतीने करण्यात आली आहे, विजय चौडेकर, प्रहार दिव्यांग संघटन नांदेड जिल्हा शहर अध्यक्ष,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या