Ticker

6/recent/ticker-posts

पालांदुरात खतविक्रेत्यांचा मनमानी कारभार




शेतकऱ्यांची आर्थिक लूट, विक्रेत्यांकडून नियमांची पायमल्ली कृषी विभागाचे दुर्लक्ष

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा कृषी विभागाने खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कंबर कसली असतानाच, पालांदूर ग्रामीण भागात मात्र खत विक्रेत्यांनी आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. जिल्ह्याभरात अनेक विक्रेत्यांचे परवाने निलंबित होत असताना, पालांदूर, खराशी आणि मुरमाडी/तूप, परिसरातील विक्रेते मोकाट असून कृषी विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात युरियाची मुबलक उपलब्धता असूनही विक्रेते शेतकऱ्यांवर विविध अटी लादत आहे. एका युरिया बॅगमागे मूळ किमतीपेक्षा १०० रुपयांपर्यंत अधिक रक्कम उकळली जात आहे. शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने नाइलाजास्तव महागड्या
दराने खत खरेदी करावे लागत आहे.विशेष म्हणजे, अनेक दुकानांबाहेर साठाचे एकाही विक्रेत्याने फलक लावणे अनिवार्य असतानाही लावलेले नाही.


चोखट डब्बा 
 
 नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,आढावा घेऊन कारवाई करण्याचे संकेत आधीच दिले गेले आहेत.
संगीता माने, जिल्हा कृषी अधिकारी, भंडारा* 


दोषींवर कठोर कारवाईची मागणी - पालांदूर कृषी विभाग अनभिग्न 

तपासणी अंतर्गत त्रुटी
आढळल्यास विक्रेत्यांचा परवाना रद्द केला जाईल असे असताना पालांदूर कृषी विभाग अनभिग्न आहेत काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होणे ही बाब शेतकऱ्यांच्या बाबतीत हैराण करणारी आहे .शेतकरी हतबल होऊन शेवटी नाईलाजाने खत विक्रेत्याकडून खत खरेदी करतो, शेतकऱ्यांना फलक न लावणाऱ्या दुकानदाराच्या व्यवहारामुळे साठ्याचा अंदाज नसतो,बिलाच्याबाबतीत ही मोठी फसवणूक याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्याकडून व्यक्त केले जात असून करवाहीची मागणी जोर धरत आहे.

 *चोखट डब्बा* 
 जिल्ह्यात कारवाई, पालांदूरला अभय का ? जिल्ह्यात १ एप्रिलपासून सुरू झालेल्या मोहिमेत १९७ केंद्रांची तपासणी करून ३६ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असून १० जणांना ताकीद देण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी ही धडक कारवाई केली असली, तरी पालांदूर भागातील दोषी विक्रेत्यांवर कारवाई कधी असा सवाल शेतकऱ्याकडून केला जात आहे तर दुसरीकडे स्थानिक कृषी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किंवा अर्थपूर्ण संबंधांमुळे ही लूट सुरू आहे का ?, असा सवाल  शेतकरी विचारत आहे असून सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.


 ई-पॉस मशीनचा वापर धाब्यावर

नियमानुसार खतांची विक्री ई-पॉस मशीनद्वारेच करणे व पक्के बिल देणे बंधनकारक आहे. मात्र, पालांदूर भागातील विक्रेते नियमांची पायमल्ली करत आहेत. खत विक्रीच्या वेळी बिल न देता महिनाभरानंतर शेतकऱ्यांना बोलावून ई-पॉस मशीनवर अंगठा घेतला जात असल्याची धक्कादायक माहिती शेतकऱ्याकडून  समोर येत आहे यामुळे खतांची लिंकिंग, काळाबाजार होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   सदर बाबीं विषयी पालांदूर कृषी विभाग अनभिग्न आहे असा सवाल शेतकऱ्याकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या