चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर -जिल्ह्यातील कुही तालुक्यातील वेलतुर येथील शहारे सभागृहात भव्य वारकरी मेळावा व धर्मजागर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून यावेळी माजी आमदार सुधीर पारवे ,माजी आमदार राजू पारवे ,माझी जि प सदस्य बालू ठवकर, प्रमोद घरडे ,लफहरी बाबा, आनंदराव राऊत जिल्हाध्यक्ष बीजेपी, सुनील जुवार, वेलतुर येथील सरपंच सुशील रामटेके, , डॉ.संजय एकापुरे भंडारा,कावळे महाराज ,पुडके महाराज, सुजित कुंभलकर, निवृत्ती महाराज ,निलेश महाराज ,संतोष महाराज ,गवळी महाराज ,ईश्वर मंदिरकर महाराज,दत्ता महाराज, फत्तु महाराज ,उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हरिभक्त परायण ओमदेव महाराज चौधरी संस्थापक गुरुकुल निमगाव यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन भाजपा अध्यात्मिक आघाडी नागपूर ,ग्रामीण रामटेक, काटोल व राष्ट्रीय वारकरी परिषद विदर्भ यांचे वतीने करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात गायक ,वादक ,कथाकार, कीर्तनकार, भजन मंडळी व वारकरी संप्रदाय यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.


0 टिप्पण्या