Ticker

6/recent/ticker-posts

आनंदी फाउंडेशनच्या सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद


प्रतिनिधी  ✍️ होमराज घुमे वरोरा.

वरोरा : आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन येथे U.G. व P.G. अंतिम वर्षातील विद्यार्थिनींसाठी NAANDI Foundation यांच्या वतीने सात दिवसीय रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आला.

१७ ते २४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यार्थिनींना रोजगार कौशल्ये, संवाद कौशल्य, Aptitude, व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअर मार्गदर्शन यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच रोजगाराच्या संधींसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला.

या सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्रशिक्षक श्रीमती रुचा लोखंडे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थिनींना व्यावसायिक कौशल्ये, प्रभावी संवाद, आत्मविश्वास आणि करिअर नियोजनाबाबत उपयुक्त माहिती मिळाली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक हेमंत परचाके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यांना प्रा. तिलक ढोबळे तसेच प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य लाभले.

प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थिनींना उच्च शिक्षणानंतरच्या रोजगाराच्या संधींसाठी तयार करणे, त्यांच्या कौशल्यांना व्यावसायिक दिशा देणे आणि आत्मविश्वास वाढविणे हा होता. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींना NAANDI Foundation तर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शैक्षणिक ज्ञानासोबतच रोजगारासाठी आवश्यक असलेल्या व्यावहारिक कौशल्यांचा अनुभव मिळाला असून, त्यांच्या करिअरच्या दृष्टीने हा प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या