◾अद्यापही पैसे मिळाले नाही • बॅंकेचे ऑडीट लवकरच • प्रकरण लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे • एका आजोबांचा आत्मदहनाचा इशारा
आशिष चेडगे • चित्रा न्यूज नेटवर्क • विशेष प्रतिनिधी
◾ भंडारा / साकोली : साकोली व सानगडीच्या सुमारे ७०० च्या वर गोरगरीब खातेदारांचे पैसे लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेने तातडीने परत करावे. यासाठी काल ( बुध. १५ जुलै ) ला समस्त खातेदारांनी भंडारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तिसऱ्यांदा धडक देत "हॅट्रीक" केली आहे. नवे रूजू झालेले जिल्हा उपनिबंधकांनी आता बॅंकेचे तातडीने ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. तर येथे एक गरीब आजोबांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला होता. यावेळी निबंधकांनी अध्यक्षांना फोन केला असता त्यांचा फोनच अस्तित्वात नव्हता.
◾लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. लाखनी अंतर्गत साकोली व सानगडी येथील सुमारे ७०० जवळपास खातेदारांनी करोडों रूपयांमध्ये गुंतवणूक केली आहे. बॅंकेतील मागील गैरव्यवहार बघता येथील खातेदारांनी भंडारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ०३ जूनला पहिली, ०२ जुलैला दुसऱ्यांदा धडकले. आणि आता कालही १५ जुलैला तिसऱ्यांदा सर्व खातेदारांनी धडकेची "हॅट्रीक" केली आहे. नवे रूजू झालेले उपनिबंधक विलास देशपांडे यांचेशी आलेल्या ७० ते ७० खातेदारांनी चर्चा केली व आत्ताच्या आता येथे अध्यक्ष विलास वाघाये यांना बोलवा म्हणाले. म्हणून उपनिबंधकांनी अध्यक्षांना फोन केला असता त्यांचा मोबाईल अस्तित्वात नव्हता व हे नेहमीच असे घडते असे संतप्त झालेल्या खातेदारांनी सांगितले. यावेळी पोहरा येथील एका आजोबांनी साकोली मिडीया "प्रतिनिधी" च्या कॅमेरा समोर येथेच आत्मदहन करणार असे म्हणताच काही काळ तणावाचे वातावरण होते. तातडीने जिल्हा उपनिबंधक यांनी या लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे सर्व शाखांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला व अधिकारींना सर्वांसमोर निर्देश दिले गेले. येथे संतापलेल्या अवस्थेतील गोरगरीब खातेदारांचे म्हणने होते की, मागे ०२ जुलैला बॅंक संचालकांना ०७ दिवसांचा तत्कालीन उपनिबंधक शुध्दोधन कांबळे यांनी अल्टिमेट दिला होता. पण सात दिवसांपेक्षा जास्त लोटले काहीच कारवाई नाही, यासाठी त्वरित एक्शन घेतली नाही तर कुणी आमरण उपोषण व आत्मदहन केल्यास याचे जबाबदार बॅंकेचे संपूर्ण संचालक मंडळ राहतील असा इशारा दिला आहे. आता उपनिबंधकांनी सोमवार २० जुलै पर्यंत तातडीने पतसंस्थेचे ऑडिट करण्यासाठी पत्र काढले जात आहे असे सांगितले.
◾थकीत असलेले पैसे परत मिळावे अन्यथा आता आंदोलन तीव्र होणार असा तिसऱ्यांदा इशारा घेऊन आज धडकलेल्या खातेदारांमध्ये साकोलीचे भोजराम बांगडकर, प्रकाश रोकडे, इंद्रकुमार मल्लानी, विनोद गुप्ता, दिलीप निनावे, मनोज कटनकार, सानगडीचे धनराज हटवार, दिपक हर्षे, प्रकाश पुसामे, मनिष बनकर यांसह साकोली, लाखनी तालुक्यातील सुमारे शंभरहून अधिक गोरगरीब खातेदार भंडारा येथे उपस्थित होते.
------------------------
⭕ येथे काय म्हणाले पिडीत वयोवृद्ध खातेदार --
"माझ्या गरीबाचे ४ लाख रुपये अडकले आहेत. सध्या शेतीचे कामे आहेत, काय करावे काही सुचत नाही. लवकरात लवकर पैसे न मिळाल्यास माझे जीवन मी कोणत्याही मार्गाने संपविणार आहे व याचे सर्वस्वी जबाबदार बॅंकेचे संचालक मंडळ राहतील"
-- रघुनाथ चंभरू निर्वाण
"वयोवृद्ध खातेदार"
मु. पो. पोहरा ( लाखनी )
⭕ काय म्हणाले जिल्हा उपनिबंधक --
"याप्रकरणी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सामान्य खातेदार जनतेचा पैसा व्याजासह मिळणारच. यासाठी आत्महत्या वगैरे असे टोकाचे पाऊल उचलू नये. महाराष्ट्र सहकारी कायदा नुसार कार्यवाही सुरू झाली आहे. यासाठी लवकरच लक्ष्मी ग्रामीण पतसंस्थेचे सर्व शाखांचे ऑडिट करण्याचा निर्णय आम्ही आता घेतला आहे"
-- विलास देशपांडे
"जिल्हा उपनिबंधक"
सहकारी संस्था जिल्हा कार्यालय भंडारा


0 टिप्पण्या