Ticker

6/recent/ticker-posts

देवरी शहरातील मुख्य बाजार चौकात चोरांचा धुमाकूळ; येवले ज्वेलर्स फोडले,

चित्रा न्युज प्रतिनिधी 
देवरी :-शहरातील सर्वात गजबजलेल्या समजल्या जाणाऱ्या मुख्य बाजार चौकातील प्रसिद्ध येवले ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी दिवाळीच्या तोंडावरच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुख्य बाजार चौकासारख्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी दुकान असतानाही चोरट्यांना पोलिसांची कोणतीही भीती उरली नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. दरम्यान, रात्री परिसरातून जात असलेल्या काही नागरिकांना दुकानाचे शटर वाकलेले आणि वर उचललेले दिसले. त्यांना संशय आल्याने त्यांनी चोरी झाल्याचे ओळखले आणि तात्काळ दुकान मालक लोकेश येवले तसेच पोलिसांना याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनाम्याला सुरुवात केली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मुख्य बाजारपेठेतच अशी चोरी झाल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. व्यापारी संघटनेने या प्रकरणी चोरट्यांना लवकरात लवकर अटक करून मुद्देमाल जप्त करण्याची मागणी केली आहे. पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या