चित्रा न्यूज प्रतिनिधी
लाखनी =श्री संत तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्था लाखनीच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी लाखनी येथील संत तुकाराम महाराज सभागृहात कुणबी बांधवांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पारंपारिक 'भुलाबाईचे गीत' उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयकृष्ण फेंडरकर,प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्या डॉ. स्वाती वाघाये, डॉ. चंद्रकांत निंबार्ते , इंजि. नरेंद्र वाघाये, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण वाढई,उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे,माजी जिल्हा परिषद सदस्य नीलकंठ कायते , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमराव आठोळे उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते तथा आमदार नानाभाऊ पटोले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार नानाभाऊ पटोले म्हणाले की, "जो समाज सामाजिक व राजकीयदृष्ट्या संघटित असतो, त्या समाजाचा वेगाने विकास होतो. त्यामुळे अशा सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाने एकत्रित येणे प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. तर डॉ. स्वाती वाघाये यांनी, ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि जातनिहाय जनगणनेसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन आपल्या मनोगतात केले.अध्यक्षीय भाषणात जयकृष्ण फेंडरकर यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी २ नोव्हेंबरच्या भंडारा येथे होणाऱ्या आंदोलनात तन-मन-धनाने सहभागी होण्याचे आवाहन केले. नुकतेच सेवानिवृत्त झालेले आणि समाजाला विशेष भरीव मदत करणारे अशोक भोयर यांचा सत्कार आमदार नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात भूमिका तिजारे,कुंदा गंथाडे, विद्या भोयर,स्मिता सिंगनजुडे, शैला सार्वे,सारिका रेहपाडे, डॉ.स्वाती वाघाये, किरण चोले यांनी सादर केलेल्या 'भुलाबाई'च्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीष्मा लांडगे व स्मिता सिंगनजुडे यांनी केले, तर आभार प्रा. उमेश सिंगजुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष माधवराव भोयर, गंगाधर लुटे, भोजराम डहाके, रमेश रोटके, मधुकर मोहतुरे, परसराम फेंडरकर, मोहन रेहपाडे, मनोज ईश्वरकर, संजय वनवे, प्रा. सोमेश्वर धांडे, नितेश टिचकुले, प्रा. निलेश चोले, नाना राघोर्ते व देवराम फटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या