Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय लेखक दिन

दि. १ नोव्हेंबर २०२६ ला असलेल्या राष्ट्रीय लेखक दिनानिमित्त साहित्यिक व अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा अभंग वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
राष्ट्रीय लेखक दिन

एक नोव्हेंबर । राष्ट्रीय लेखक ।
दिन असे खास । लेखकांचा ॥

अन्याय शोषण । वर्ण जाती भेद ।
ग्रंथातून छेद । लेखकाच्या ॥

तत्वज्ञ लेखक । चिंतन प्रतीक ।
वंचित दर्शक । आत्मभान ॥

शब्दशिल्पिच्या या । तेज लेखनीला ।
सत्य चिंतनाला । सलाम हा ॥ 

साहित्यात असे । सामाजिक जाण ।
समाजात मान । लेखकाला ॥

लेखनीला असे । धार वैचारिक ।
अन् सांस्कृतिक । लेखकाच्या ॥

समाजाची मूल्ये । समता विचार ।
जीवनाचा सार । शब्दातून ॥

परिवर्तनाचे । एक शिल्पकार ।
तेच कथाकार । ग्रंथकार ॥

एक नोव्हेंबर । लेखकाच्या दिनी ।
प्रणाम करांनी । लेखकांना ॥
        
संत कबीर कविराज पुरस्कार प्राप्त 
          अभंगकार 
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, अमरावती:८०८७७४८६०९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या