Ticker

6/recent/ticker-posts

राज्य सरकार नी पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी 50000 रु द्यावे विनोद भाऊ सोनारीकर


लिंगोजी कदम हिमायतनगर तालुका प्रतिनिधी नांदेड 

हिमायतनगर :-गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन,कापुस, मूग, उडिद, भात, ज्वारी, मिरची, या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे.* *यामुळे या नुकसानीचे पंचनामे न करता तत्काळ भरपाई देण्यासह संपूर्ण नांदेड जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विनोद दुर्गेकर यांनी केली.* 
  *यात म्हटले आहे की, तुफान पावसाने जिल्हात अनेक नद्यांना पुर आल्यामुळे अनेक ठिकाणी जीवितहानी झाल्याचे कळते कृषि क्षेत्राला पण दणका बसला आहे. पिकांची दैना उडाली आहे. दुबार पेरणी केलेली   पिके उद्ध्वस्त झाली आहेत. सोयाबीन, कापुस व मूग, उडिद जागेवरच कुजलेले आहे. मिरची,ज्वारीची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. आणि पाणी व वार्‍यामुळे वर आलेली पिक भुईसपाट  झाले आहे. यामुळे उत्पादनाला फटका बसणार आहे. या पिकांकडे नगदी पिक म्हणून शेतकरी पाहतात. सोयाबीन व ऊसापासुन हमखास उत्पन्न शेतकर्‍यांना मिळत असते. परंतु या पावसाने आर्थिक फटका बसणार आहे. यामुळे जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्‍यांचे झालेले नुकसान पंचनामे न करता तत्काळ भरपाई द्यावी. सोयाबीन, कापुस, मूग, उडिद आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचेही पंचनामे न करता भरपाई द्यावी. अन्यथा शेतकर्‍यांना व शेतीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना आत्महत्येशिवाय पर्याय राहनार नाही.  सरसगट हेक्टरी 50000 रू भरपाई द्यावी आणि नांदेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, पुरामध्ये वाहुन आपले प्राण गमावलेल्या नांगरीकांना, शेतकर्‍यांना सुद्धा दहा लाख रुपयांची तत्काळ मदत यांच्या कुटुंबीयांना जाहीर करावी अशी मागणी भाजपा सोशल मिडिया तालुका अध्यक्ष विनोद भाऊ सोनारीकर यांनी केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या