Ticker

6/recent/ticker-posts

पावसाळ्यात पाणी स्रोताजवळ स्वछतेची दक्षता घ्यावी - कृष्णा पाटील कोळीकर


कृष्णा चौतमाल ग्रामीण तालुका प्रतिनिधी हदगांव जि . नांदेड.

हदगांव:-पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे विविध आजार उद्भवत असतात. यामुळे सार्वजनिक पाणी पुरवठा स्रोता जवळ स्वछतेची दक्षता घेऊन शुद्ध पाणी पुरवठा  साठी ग्रामपंचायतींनी नियोजन करण्याचे आवाहन कोळी येथील काँग्रेसचे युवानेते तसेच नाना भाऊ पटोले युवा मंच उपतालुका प्रमुख कृष्णा पाटील कोळीकर यांनी केले आहे.

 सध्या पावसाळा सुरु असून पावसाळ्यात पावसाचे आणी सार्वजनिक हात पंप बोअर विहिरी जवळ साचते याचं बरोबर घाणपानि चिखल साचून घाण होते.  याचं प्रमाणे काही गावात नळ योजना पाईप लाईन लिकेज तथा वाल लगत घाणपाणी कर कचरा चिखल साचून पाणी दूषित होते. दूषित पाण्याने साठी चे रोग पसरण्या बरोबर डासाचा प्रादुर्भाव वाढतो. व रोग राईस निमंत्रण मिळते. यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामीण भागात गाव वाड्या तांड्यात असलेले पाणी स्रोत लगत घाणपाणी चिखल साचू देऊ नये. नियमित स्वछता ठेवावी. सुधीकरण प्रक्रिया करून पाणीपुरवठा करण्याचं आवाहन युवानेते तसेच नानाभाऊ पटोले युवा मंच उपतालुका प्रमुख कृष्णा पाटील कोळीकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या