Ticker

6/recent/ticker-posts

हदगांव तालुक्यात मुसळधार पाऊस.


कृष्णा चौतमाल  तालुका प्रतिनिधी ग्रामीण हदगांव जि.नांदेड

हदगांव. नांदेड जिल्यातील हदगांव तालुक्यात सतत चार दिवसापासून सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागातील ओढे नाले कठोकाठ भरून वाहत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कलीत झाले आहे. चार दिवसापासून तालुक्यात सूर्यदर्शन झाले नाही. 
      तालुक्यात चार दिवसापासून तालुक्यात हाहाकार् घातला आहे. धो धो पडणाऱ्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. चार दिवसापासून होत असलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते खरडून गेले आहेत. तालुक्यातील कयाधू नदी कठोकथ भरून वाहत आहे. 
          ग्रामीण भागातले ओढ्याछे पाणी काठो काठ भरून वाहत असल्याने पाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने पाणी शेतांत शिरले असल्याने  शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या