चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-वाढवणा बू.पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजे.नावंदी गावच्या शिवारात असलेल्या एका चिंचेच्या झाडाखाली बिनधास्तपणे चालणा-या 'तिर्रट' नावाच्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखा,
लातुरच्या तडफदार पथकाने स्थानिक पोलिस पथकासह 'रेड' केली आणि पाच जुगारी (आरोपी) सह २ दुचाकी,२ सायकलींसह ५ मोबाईल आणि नगदी रोख ४७,४०० असा एकुण १५ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यावेळी ९ पैकी ५ जुगारी पकडले तर ४ जुगारी पोलिसांची चाहूल लागताच फरार झाले.
स्थागुशाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे जुगार खेळणारे व खेळवणा-यांमध्ये खाकीची दहशत बसली असून या 'रेड' ची चर्चा दुरदुरवर आहे.
याबाबत स्थागुशा पोलिस सुञाकडून मिळालेली माहिती अशी की,नांदेडचे पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप,लातुरचे अधिक्षक अमोल तांबे,स्थागुशाचे अधिक्षक सुधाकर बावकर,अप्पर पोलिस अधिक्षक मंगेश चव्हाण यांचे आदेश व सुचनेप्रमाणे स्थागुशाचे पथक उदगीर तालुक्यात आले असता त्यांना उदगीर तालुक्यातील नावंदी गावच्या शिवारात चिंचेच्या झाडाखाली 'तिर्रट' नावाचा जुगार खेळत आणि खेळवत असल्याची माहिती 'खब-याने' दिली असता तत्काळ वाढवणा पोलिसांशी संपर्क करुन व त्यांना सोबत घेऊन नावंदी शिवारात 'रेड' केली असता,दत्ताञ्य विश्वनाथ केंद्रे यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली कांही 'हायटेक' जुगारी पैशावर 'तिर्रट' खेळत असल्याचे दिसून येताच स्थागुशाची टीम व वाढवणचे सपोनि. सुनील पी.गायकवाड यांची टीम मिळून जुगार परिसरास घेराव घालून 'अटॅक' केला असता ५ जुगारी हाती लागले तर ४ जुगारी फरार झाले.
या 'रेड' मध्ये २ कार,२ सायकली,५ मोबाईल सह नगदी रोख मिळून एकुण १५ लाख २ हजार ४०० रुपयांच्या मुद्देमालासह ५ जुगा-यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.तर पोलिसांच्या तावडीतून निसटण्यास ४ जुगारी यशस्वी झाले असून फरार जुगा-यांचा शोध वाढवणा पोलिस घेत आहेत.
स्थागुशा लातुर व वाढवणा पोलिसांच्या युतीने अचानक 'अटॅक' केल्याने भांबावलेल्या जुगारी मंडळींची पळापळ सुरु झाली आणि यात नऊ पैकी चार जुगारी फरार झाले असून यावेळी अटक केलेले जुगारी (१) माधव भुजंग मोतेवाड,
(२) आसीफ सिकंदर मजकुरी,(३) सुदर्शनदेव मुलशंकर कपासे,(४) महेबूब युसूफ शेख
(५) बालाजी गोविंद गुट्टे यांना ताब्यात घेतले आहे.तर यावेळी (१) गणेश बालाजी पेद्देवाड,
(२) अली हैदर बागवान,(३) सदा राठोड,
(४) बस्वराज उर्फ राजू मिंचे हे ४ जुगारी फरार झाले असून म.जु.अधिनियमाच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा नोंद केला असून याचा पुढील तपास पो.ह.संजय कलकत्ते हे करत आहेत.
'रेड' यशस्वी केलेले स्थागुशाचे पोलिस पथक :
पोलिस उपनिरीक्षक अमर केंद्रे,अंमलदार हाके साहेबराव,सुर्यकांत कलमे,पाराजी पुठ्ठेवाड,रसूल पठाण,संजय कांबळे,अर्जून राजपूत,मनोज खोसे,तुळशीराम बरुरे,प्रेमदास राठोड,चंद्रकांत केंद्रे यांनी ही 'रेड' यशस्वी केली.


0 टिप्पण्या