सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड:- जामखेड चे ग्रामदैवत श्री नागेश्वराच्या पावन भुमित नागपंचमी निम्मित महाराष्ट्रात सुप्रसिध्द अशी ओळख असणारी सालाबादप्रमाणे जामखेड शहरात यात्रा भरली जाते आपल्या गावाची यात्रा आहे या भावनेने सर्वधर्मीय लोक सहभागी होऊन मोठ्या उत्सवाता यात्रोत्सव पार पाडतात यात्रेत खास आकर्षण आंनदीमेळा असतो तत्पुर्वी यात्रेचे नियोजन करण्यासाठी प्रशासनामार्फत शांतता समीती बैठकीचे आयोजन केले जाते बैठकीत दरवर्षी नागरीकांचे म्हणणे ऐकूणच प्रशासन निर्णय घेत असते पंरतू यावर्षी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठकीत नगरपरिषदेने एकतर्फी निर्णय घेऊन नागरिकांच्या सुचनेकडे दृलक्ष करुन तहसिलदार यांच्या सांगता भाषाणाच्या आधीच बैठक आटोपती घेतली तालुका दंडाधिकारी असलेल्या तहसिलदार यांचा हा अपमान केल्याचा आरोप करत बारा वर्षांपासून शांतता समितीचे अधिकृत सदस्य असेलेले विकीभाऊ सदाफुले यांनी याबाबीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आंनदीमेळा शहरातून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या राऊत मैदान बीड रोड येथे भरविण्याचा निर्णय मान्य नाही.
कारण या जागेवर येण्या- जाण्यासाठी तसेच सुरक्षेच्या बाबतीत सदर जागा योग्य राहणार नाही मार्केट कमीटी बीड रोड येथेच आंनदीमेळ्यासाठी जागा योग्य आहे अशी नागरीकांची भावना असताना प्रशासनाने नागरिकांच्या सद् भावनेचा आदर करत जागा बदलावी किंबहूना दोन तीन ठिकाणी आंनदीमेळा भरवण्यासाठी परवानगी द्यावी
परवानगी न दिल्यास आंदोलनाचा पवित्रा हाती घेऊ असा इशारा आंबेडकरी चळवळीचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी दिला आहे.


0 टिप्पण्या