Ticker

6/recent/ticker-posts

संस्कार भारतीचा श्री .नटराज पूजन तसेच गुरुपौर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गुरुवार दिनांक 13 ऑगस्टला स्थानिक सार्वजनिक वाचनालयातील इंद्राराज सभागृहामध्ये संस्कार भारती भंडारा व सार्वजनिक वाचनालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने नटराज पूजन तसेच गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला दीप प्रज्वलन करतेवेळी श्री. प्रकाश मुरकुटे यांचे ओमकार स्वरूपा हे गीत सादर झाले. त्यानंतर संस्कार भारती ध्येय गीत सादर करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री. धनंजय दलाल यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.नंतर श्री विनोद पथ्ये आणि त्यांच्या चमूने उत्तम बासरी वादन, तबला आणि पेटीच्या सोबत गुरुवंदना सादर केली.
आशिता क्लासच्या गणेश वंदनावरील नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यातील सहभागी कलावंत होते हर्षिता चौधरी मौल्या डोनेकर शुभ्रा झोडे  स्पृहा झोडे योगिता गराडे.सौ. चंदाताई मुरकुटे यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर प्रांत उपाध्यक्ष श्री. देशपांडे सरांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सत्कारमूर्ती आदरणीय श्री. चंदूकाका घरोटे पश्चिम क्षेत्र प्रमुख संस्कार भारती  तसेच त्यांच्या धर्मचारिणी आदरणीय सौ.रोहिणी घरोटे संयोजिका मातृशक्ती विदर्भ प्रांत या कला तपस्वी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना दोघांनीही कार्यकर्ता कलाकार होणे आणि कलाकार  कार्यकर्ता होणे म्हणजे संस्कार. त्यांच्या ह्या चाळीस वर्षाच्या कला प्रवासातील अनुभव त्यांनी कथन केले. त्यानंतर स्वरांजली म्युझिकल ग्रुप संस्कार भारती भंडारा तर्फे गीत गायनाचा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. यातील गायक कलावंत होते मोहन चेपे,आनंद चेपे, प्रकाश मुरकुटे, प्राची देशपांडे आणि प्रिया राजहंस यांनी सरस गाणी गाऊन रसिकांची मने जिंकली. संस्कार भारती महिला द्वारा बहारदार नृत्य प्रस्तुती करण्यात आली. त्यातील सहभागी माउली होत्या रंजना घोडोले, प्रिया कोल्हे,करुणा शेंडे, ज्योती साकुरे, नंदा तिडके,अंजली कैकाडे ,पद्मा तिडके,जया कडियम,गीता झोडे. सभागृहाचे प्रवेशद्वार स्वागतासाठी रांगोळीने सुशोभित करणारे कलाकार होते, अनिता चौधरी,करुणा शेंडे ,गीता झोडे ,चंदा मुरकुटे,पद्मा तिडके.सहभागी ना सन्मान चिन्ह देऊन गौरवांकित करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता प्राची देशपांडे हिच्या सुमधुर पसायदानाने झाली. या कार्यक्रमाचे संपूर्ण संचलन सौ. अर्चना पथ्ये यांनी केले .तर आभार प्रदर्शन सौ .सरोज धाबेकर यांनी .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कार भारती कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी तसेच सदस्य गण ,सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तसेच कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या