Ticker

6/recent/ticker-posts

पायी इशारा हल्लाबोल मोर्चात पालकमंत्र्यानां रस्त्यावर बसवले आंदोलकांनी

वंचित बहुजन आघाडीच्या गायरान/ शासकीय जमिन अतिक्रमण साधनांच्या घरे व शेती वाचविण्यासाठी जळगाव येथे मोर्चा…

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


जळगाव :-२६/११/०२२ रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महाराष्ट्र शासनाने जमिनिवरचे वास्तव व परिस्थिती याची पडताळणी न करता महाराष्ट्रभरात गायरान/ शासकीय जमिन अतिक्रमण धारकांच्या घरे व शेतीवर कारवाई सुरु केली आहे. हि कारवाईची ची प्रक्रिया हि शासन व प्रशासनाला न्यायालयात तारणारी असेल पंरतू संबंध महाराष्ट्रात यामुळे लाखो लोक हे भूमिहीन आहेतच पंरतु बेघर होणार असुन वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे. याच धर्तीवर जळगाव जिल्ह्यात देखील कारवाईचे आदेश व प्रक्रिया सुरू झाली असुन वंचित बहुजन आघाडीने याविषयी यल्गार पुकारला असुन आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे घरावर हल्लाबोल इशारा मोर्चाचे आवाहन केले होते त्यात संपूर्ण जिल्हातील दोन हजार दोनशे महिला पुरुष युवकांनी भाग घेतला.

आंदोलनाला सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज मैदान जळगाव येथून झाली. बस स्थानक सावरकर पुतळा असे करत जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा पोहचला असता.।पोलिस प्रशासनाला पुढे करत आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याठिकाणी पोलिसांसोबत आंदोलकांची शाब्दिक चकमक उडाली. व आंदोलकांनी बॅरिकेटस् पार करत पाळधी महामार्गावर चालायला सुरूवात केली. जिल्हा प्रशासन व पालकमंत्री असा दुहेरी राजकीय दबाव पोलिस प्रशासनावर आहे व पालकमंत्री हे चर्चेला आमच्या मार्गात जिथे भेटतील तिथे आम्ही चर्चा करु. असा पवित्रा राज्य सदस्य वंचित बहुजन युवा आघाडी शमिभा पाटील,वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष जळगाव पूर्व विनोद सोनवणे,जिल्हाध्यक्ष जळगाव पक्ष्चिम प्रमोद इंगळे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी जळगाव वंदना सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष जितू केदार,कामगार आघाडी जिल्हा चिटणिस बालाजी पठाडे, वंचित बहूजन युवा आघाडी बाळा पवार,माजी सैनिक देवदत्त मकासरे मेजर,महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना आराक,महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा मिरा वानखेडे,रावेर तालुकाध्यक्ष बाळु शिरतुरे,शेख याकुब,ललीत घोगले,डिगंबर सोनवणे,वंदना सोनवणे,राजेंद्र अवसरमल,ज्ञानदेव कोळी व इतर पदाधिकारी व आंदोलकांनी घेतला.व मोर्चा महामार्गावर लागला. उड्टणपुलावर पालकमंत्री पोहचल्यामुळे आंदोलकांनी तिथेच त्यांचे सोबत बसून निवेदन देऊन निवेदनातील विषयावर चर्चा केली. त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विषय शासनदरबारी मांडून न्याय मिळवून देण्याची हमी दिली तसेच या विषयावर राज्य शासन उच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करत असुन त्यावर येत्या दोन चार दिवसात निर्णय होईल. व जनेतेची परवड होऊ देणार नाही असे आश्वस्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या