Ticker

6/recent/ticker-posts

धर्म,जात व भाषेचा अहंकार न बाळगता संविधान टिकवणे गरजेचे: डॉ.ऋषीकेश कांबळे.


रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

औरंगाबाद :-भीमनगर,भावसिंगपुरा मधील रमाबाई आंबेडकर चौक येथे संविधान दिन व २६/११ मुंबई भ्याड अतिरेकी हल्ल्यात शहीदांना व बळी पडलेल्या निष्पाप नागरीकांना ख्रिस्ती कृती समिती व रमाबाई आंबेडकर चौक मित्र मंडळातर्फे अभिवादन करण्यात आले.यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतान 26 नोव्हेंबर 1949पूर्वी
 राजा हा राजाच्या पोटी जन्मात येत होता,यापुढे तो मतपेटीतून जन्मात येईल आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकंरानी रक्ताचे पाणी करून 2 वर्ष अथक परिश्रम करून संविधानाची निर्मिती केली.हे संविधान टिकविण्यासाठी धर्म,जात व भाषेचा अहंकार न- बाळगता सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले. यानिमित्त शासकीय घाटी रुग्णालय औरंगाबाद यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 47 रक्तदात्यानी रक्तदान केले,ख्रिस्ती कृती समिती मंडळातर्फे सलग चौदा वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांना संविधान व राष्ट्रीय एकात्मतेची शपथ यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती जेष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे,सहायक पोलिस निरीक्षक वाहतूक नितीन कामे,पोलिस उपनिरीक्षक सचिन वायाळ,प्रा.मनोहर लोंढे,अँड.सतिश बोरकर,जी.एन.खंडागळे मामा,रवींद्र निर्मळ, जयश्री शिर्के, रुपाली गणगावणे, योगिता वैष्णव ,फिलिप दुशिंग,नंदकुमार अडगळे,अनिल खरात,सुनील बोरगे,अनिल साठे,हनोख देवकाते,प्रभाकर म्हस्के,विनोद वैरागर,प्रमोद सवित्रे, बेंजामिन चांदणे,अप्पासाहेब बचके,शबाब शेख,नितिन काळे, सचिन बचके,मंगेश जाधव,अतिश लोखंडे,शिवराज सोनवणे,सुनील गायकवाड,सचिन सौदागर,बाबा भंडारी,अजय चांदणे,अनिल बचके. यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी 
ख्रिस्ती कृती समिती व रमाबाई आंबेडकर चौक मित्र मंडळाचे रवी साळवे, सचिन सकट,निखिल चांदणे,अण्णासाहेब बोरगे,नितिन पाटोळे,सदानंद कांबळे,विल्सन गायकवाड,संदीप पगारे,अमोल पाखरे,विकास जाधव,दिलीप अहिरे, दिपक कांबळे,विशाल घोडके आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील डोणगावकर व आभार प्रदर्शन आयोजक ख्रिस्ती कृती समितीचे अध्यक्ष विजय निकाळजे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या