सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :-
सध्या महाराष्ट्रा मध्ये बहुजन महापुरुषांची अवहेलना आणि अपमान करण्याची जणू चढाओढ चालू आहे त्यामध्ये राज्याचे राज्यपाल कोश्यारी असतील किंवा BJP चे प्रवक्ते असतील हे ह्या प्रकरणात अग्रणी आहेत। त्या मध्ये आगीत तेल ओतण्याचे काम कोथरूड विधान सभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील याच्या बदल गरळ ओकून केले आहे.बहुजन महापुरुषांची अवहेलना करणारे सर्वच सर्व BJP चे व RSS चे कार्यकर्ते ,पदाधिकारी आहेत आणि ते हे कृत्य संघटितपणे करत आहेत .त्या कृत्याला व त्या बेजवाबदार लोकांचा निषेध करण्यासाठी आणि चंद्रकांत पाटील यांचेवर शाही फेक करण्याऱ्या भारतीय नागरिकांवर पोलीस प्रशासनाने ३०७ सारखे गम्भीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले त्या प्रशासनाच्या निषेधार्थ दि १2
डिसेंबर २०२२ रोजी जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे निवेदन देण्यात आले
*महापुरुषांची बदनामी करणाऱ्या शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व भगतसिंग कोशारी यांच्या वरती कायदेशीर कारवाई करावी यासाठी बहुजन मुक्ती पार्टी कडुन जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.
जामखेड तहसील कार्यालय येथे बहुजन मुक्ती पार्टी जामखेड युनिट व भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन सेना आणि इतर समविचारी पक्ष, संघटनाना सोबत घेऊन भाजप चे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषाबददल अवमानकारक वक्तव्य केल्या बद्दल त्याच्या निषेधार्थ सर्वानी उपस्थित राहुन जाहीर निषेध केला व जामखेड तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.
इथून पुढे महापुरुषांचा अपमान करणार्यांना मग तो कोणत्याही पक्षातील असो गय केली जाणार नाही, अशी ग्वाही बहुजन मुक्ती पार्टी व संघटनान कडुन देण्यात आली महापुरुषांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.
या वेळी बहुजन मुक्ती पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष विनोद शिरसाठ, परमेश्वर मोरे, गणेश घायतडक, गोरख राजगुरू, भरतीय बौद्ध महासभेचे पंडित मोरे, रिपब्लिकन सेना चे विजय रनसिग आधी कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या