Ticker

6/recent/ticker-posts

मुरमाडी येथे गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापले


सरपंच पदाकरीता दुहेरी लढत


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :-लाखनी तालुक्यात मुरमाडी/सावरी सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्याने निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष असते. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित मुरमाडी/सावरी विकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार मनोज ईश्वरकर आणि भाजपा प्रणित परिवर्तन पॅनल चे सरपंच पदाचे उमेदवार शेषराव वंजारी हे दोनच नामांकन शिल्लक राहिल्याने दुहेरी लढत होणार आहे. कार्यकर्ते आपलाच उमेदवार निवडून यावा. या करिता प्रयत्नशील असल्यामुळे गुलाबी थंडीतही राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसत आहे. 
        १७ सदस्यीय मुरमाडी/सावरी ग्रामपंचायतीची लोकसंख्या अंदाजे ९ हजार २०० असून गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित असून निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित मुरमाडी/सावरी विकास आघाडी चे मनोज इश्वरकर तर भाजपा प्रणित परिवर्तन पॅनल चे शेषराव वंजारी यांचेच २ नामांकन शिल्लक असल्यामुळे तुल्यबळ लढत होणार आहे. मनोज ईश्वरकर यांनी यापूर्वी प्रभाग क्रमांक ४ चे प्रतिनिधित्व केले असून अनेक विकास कामे केली आहेत. त्यांचेकडे कृषी केंद्र व विट व्यवसाय असल्याने त्यांचा अनेक शेतकरी व शेतमजूरांशी रोजच संपर्क येतो. तसेच गावात सजातीय मतदारांची संख्या अधिक असल्यामुळे सध्या तरी त्यांचे पारडे जड असल्याचे मतदारांत चर्चा होत आहेत. भाजपा प्रणित परिवर्तन पॅनल चे शेषराव वंजारी हे माजी उपसरपंच होते. पण त्यांनी आपल्या प्रभाग क्रमांक २ चाच विचार केलेला आहे. तेही हार्डवेअर व सिमेंट व्यवसायिक असून त्यांचाही अनेकांशी जनसंपर्क येतो. त्यामुळे ते तुल्यबळ लढत देऊ शकतात. असाही एक मतप्रवाह मुरमाडी/सावरी त सुरू आहे. 
          मुरमाडी/सावरी विकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून यावेत या करिता जिल्हा परिषद सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते, पंचायत समिती सदस्य विकास वासनिक, निमा चे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजू निर्वाण, माजी सभापती अशोक चोले तर परिवर्तन पॅनल चे उमेदवार निवडून यावेत याकरिता भाजपा जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, ओबीसी मोर्चा राज्य उपाध्यक्ष राजेश बांते, माजी पंचायत समिती सदस्य धोंडू वंजारी, रजनी पडोळे, भाजपा तालुकाध्यक्ष धनंजय घाटबांधे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील असल्यामुळे निवडणूक ज्वर चढला असून गुलाबी थंडीतही राजकीय वातावरण तापले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या