Ticker

6/recent/ticker-posts

रत्नापूर, शिऊर व राजूरी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उद्या दि. २ डिसेंबर रोजी ५:३० पर्यंत अर्ज भरण्याची मुदत, आॅफलाईन अर्ज भरण्यासाठी मिळाली परवानगी.

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-01/12/2022
       जामखेड तालुक्यातील रत्नापूर, शिऊर व राजूरी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी उद्या दि. २ डिसेंबर सायंकाळी ५:३० पर्यंत असून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असल्याने उमेदवारारांना आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत. तशी अधिकृत परवानगी मिळाली असल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
  दरम्यान या निवडणुकीत तिन्ही ग्रामपंचायतसाठी प्रत्येकी नऊ सदस्य संख्या असून आज अखेर राजूरी १४, रत्नापूर २२, शिऊर १२ असे सदस्य पदासाठी तर सरपंच पदासाठी राजूरी २, रत्नापूर २, शिऊर ३ असे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
    या तिन्ही ग्रामपंचायतसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, यासाठी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या