Ticker

6/recent/ticker-posts

बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार


सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

सांगली : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी शुक्रवार, दि. 30 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 11 ते 12 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज.बा. करीम यांनी दिली.
 ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनारमध्ये NCS किंवा Mahaswayam  वेबपोर्टलव्दारे नोकरीच्या संधी या विषयावर यंग प्रोफेशनल मॉडेल करिअर सेंटर ठाणे चे आशुतोष साळी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.  इच्छुक युवक व युवतींनी https://meet.google.com/kvd-ccio-ahx या लिंकवर वेबीनारमध्ये विहीत वेळेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या