रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्र सरकारचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री मा.ना.रामदासजी आठवले यांचा वाढदिवस वॉर्ड क्र.82(84) मुख्यकार्यालय मरोळ पाईप लाईन अंधेरी पूर्व या ठिकाणी मतीन अहमद शेख यांच्या अध्यक्षतेखाली काल केक कापून आणि अल्पहार देऊन साजरा करण्यात आला.
नाकोड़ा मित्र मंडळचे अध्यक्ष
श्री.अरुण जी सिरोया,गोपीदाजी वैष्णव,महावीरजी कोठरी, अशोकजी सुराणा,शंकरलालजी प्रजापति,सोनूजी रांका हे देखील आवर्जून उपस्थित होते. ह्या वेळी मुंबईचे नेते रतन स.अस्वारे, रितेश घायवट,विजय सोनताटे, प्रमोद गोतपागर, ह्यांनी संघर्षनायक, लोकनेते मा. ना. रामदासजी आठवले यांच्या कारकिर्दीवर भाषणे केली.ह्या दरम्यान वॉर्डाचे नेते पांडुरंग भंडारे यांचा देखील वाढदिवस होता आणि तों देखील कार्यालयात साजरा करण्यात आला.
ह्या प्रसंगी तालुक्याचे नेते किशोर रनशूर, वॉर्डाचे बबन सोरटे, मायावती तांबे, काशीबाई सूर्यवंशी, सह अन्य पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि सूत्रसंचालन वॉर्डाचे सरचिटणीस दिलीप महादेव कांबळे यांनी केले. अशी माहिती विलेपार्ले तालुक्याचे मा. प्रसिद्ध प्रमुख गणेश प्रभाकर ठोकळे यांनी दिली आहे.


0 टिप्पण्या