Ticker

6/recent/ticker-posts

अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे तक्रारी निवेदन मा मुख्यमंत्री यांना देण्यात आले...

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

सोलापुर - बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर सोलापूर मध्यवर्ती महामंडळाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांना भेटून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करा व भिम योद्धा मनोज गरबडे, धनंजय इजगज, विजय ओव्हळ,या तिन्ही भीमसैनिकांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घ्या तसेच पोलिसांवर केलेले निलंबनाची कारवाई मागे घ्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे तक्रारी निवेदन मा मुख्यमंत्री यांना दिले.

विषय:- १)महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले कर्मवीर भाऊराव पाटील या तिन्ही महापुरुषावर महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांनी खालच्या पातळीवर वादग्रस्त अपमानास्पद वक्तव्य करून तिन्ही राष्ट्रीय महापुरुषांचा अवमान केल्याने तमाम आंबेडकर समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांच्यावर ॲट्रॉसिटी व इतर प्रचारित नियमानुसार गुन्हे दाखल करणे बाबत

२) भिम योद्धा मनोज गरबडे धनंजय विजय ओव्हळ यांच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाकडून दाखल केलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्वरित मागे घेण्याबाबत

३)सदर प्रसंगी कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर केलेली निलंबनाची कारवाई रद्द करून त्वरित सेवेत रुजू करून घेणे बाबत

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूर मध्यवर्ती जयंती महामंडळ सोलापूरच्या वतीने तक्रारी अर्ज निवेदन सादर करीत आहोत की औरंगाबाद जिल्हा पैठण तालुक्यातील कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिनांक 9/12/2022 रोजी जाहीर सभा आयोजित करून त्यामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील या सामाजिक समतेच्या महापुरुषांना भीक मागून शाळा महाविद्यालय सुरू केली असे बदनामीकारक वक्तव्य केले त्यांच्या तमाम भारत देशासाठी आज तगायत दिलेल्या योगदान व समाजकार्याचा अनादर करीत तमाम फुले शाहू आंबेडकर जनतेच्या भावना दुखावले आहेत. 
समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा व महाराष्ट्र देशामध्ये जातीय दंगली घडून समाजातील देशातील व राज्यातील शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचे कट व कुटील कारस्थान माननीय चंद्रकांत पाटील या भाजप पक्षाच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्य केल्याने तमाम भीमसैनिकाच्या सर्व भारतीय जनतेच्या भावना तीव्रपणे दुखावल्या असून चंद्रकांत पाटलावर भारतीय संविधान तरतूद प्रचलित लागू कलमाद्वारे व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा
तसेच मा. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेकणाऱ्या कार्यकर्त्यावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत ते त्वरित मागे घेण्यात यावेत
या घटनेच्या वेळेस कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित केलेले आहे या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत घेण्यात यावे अन्यथा 
या गंभीर विषय प्रसंगी तमाम आंबेडकर पुरोगामी विचाराच्या जनतेकडून उग्र आंदोलन करावे लागेल सदर होणाऱ्या आंदोलनाच्या परिणामास आपण व आपले सरकार सर्वस्वी जबाबदार राहणार याची कृपया नोंद घ्यावी.
या प्रसंगी बाळासाहेब वाघमारे आनंद चंदनशिवे गणेश पुजारी शांतीकुमार नागटिळक अजित बनसोडे केरू जाधव पप्पू गायकवाड सचिन शिराळकर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या