Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्याच्या हिताचे काम करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकजुटीने राहून विजय मिळऊ. :- माजी आमदार नागेश पाटील..बालाजी शाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची बैठक संपन्न ..


लिंगोजी कदम :- जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड :-9689821132
                                        
हिमायतनगर -:  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने हिमायतनगर येथील बालाजी शाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची एक महत्त्वपूर्ण बैठक माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीला मार्गदर्शन करताना आष्टीकर यांनी असे सांगितले की शेतकऱ्याच्या हिताचे कामे करण्यासाठी आगामी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी, चेअरमन , व हमाल मापाडी,ह्या सर्वांनी एकजुटीने राहून कृषी उत्पन्न बाजार समिती वर विजय मिळवावा असे आव्हान त्यांनी यावेळी केले

या बाबत सविस्तर वृत्त असे की अगोदरच देशातील भाजपा कार्यकर्त्यांना दम दाटी करून ,हुकूम शाही करत आहे त्यामुळे हिमायतनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी होणाऱ्या सर्वत्रित निवडणुकी संदर्भात माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याची एक महत्त्वपूर्ण बैठक शहरातील बालाजी विद्यालय पाण्याच्या टाकीजवळ आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीस तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटीचे सर्व चेअरमन ,सभासद व व्यापारी ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीती लावली होती तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी असे सांगितले की तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी आपण काम करत आलो आहोत त्यामुळे येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला शेतकरी हिताचेच काम करायचे आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी एक जुटिने राहून आपल्या शिवसेना व राष्ट्रवादीचे पॅनल निवडून आनन्यासाठी सर्वांनी एक जुटीने राहून काम करा आपल्याला नक्कीच यश मिळेल त्यासाठी कार्यकत्यांनी कुठलाही मत भेद न ठेवता कामाला लागावे असे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपस्थित बैठीत बोलतांना सांगितले..

यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बळीराम देवकत्ते, वसंत सहकारी साखर कारखान्याचे मदनराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष सुनील पतंगे, बाजार समितीचे माजी सभापती दतराम पाटील करंजीकर, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद, वडगाव ज. चे सरपंच विशाल राठोड, प्रकाश जाधव, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,तालुका संघटक संजय काईतवाड,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान पठाण, शहर अध्यक्ष उदय देशपांडे,इरफान खान,अरविंद सोळंके,सुमेध भरणे,विशाल राठोड,श्रीराम माने पाटील, अवधूत देवसरकर, अरविंद पाटील सीरपल्लीकर,गिरी दळालगिर,युवा सेना तालुका प्रमुख योगेश पवार, संतोष पुलेवार, संटी कप्पलवाड, राम गुंडेकर,बालू आलेवाड, विक्रम गोपेवाड,आनंद अंगुलवार ,लक्ष्मण राऊत.गजानन गोपे वाड,सह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी व सरपंच चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या