Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आदर्श कार्यकर्त्यांनी घ्यावा - सिद्धार्थ कासारे

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे शक्तिप्रदर्शन घडविण्याचा निर्धार

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


मुंबई : - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री संघर्षनायक ना.रामदास आठवले यांनी संघटन कौशल्य आणि प्रचंड मेहनत करून संपूर्ण भारतात रिपब्लिकन पक्षाची ठळक ओळख निर्माण केली आहे. त्यांचा आदर्श घेऊन रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आपल्या भागात सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन काम करावे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे शक्तिप्रदर्शन घडविण्याच्या तयारीला लागावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी केले. चेंबूर येथे रिपाइं चे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे यांच्या नेतृत्वात रिपाइंचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आणि केंद्रीयराज्यमंत्री संघर्षनायक ना.रामदास आठवले यांचा वाढदिवस सोहळा संघर्षदिन साजरा करण्यात आला.यावेळी रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.यावेळी ना.रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून ; लाडू ;जिलेबी वाटप करून उत्साहात ना.रामदास आठवले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

यावेळी रिपाइंच्या महिला आघाडी नेत्या फुलाबाई सोनवणे; बाळासाहेब गरुड; एम चव्हाण; मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार ; कामु पवार; महादेव साळवे;अनिस पठाण; सुभाष साळवे; बाळासाहेब बनसोडे; साहेबराव ससाणे रिपाइं महिला आघाडी च्या नेत्या चंद्रकला वाटोरे; प्रमुख संघटक सौ.नैनाताई वैराट; ताराबाई वाघमारे; रझिया शेख; राजेश चौरसिया; सोपान खंडागळे; संजय इंगळे; अशोक साबळे; गणेश भद्रीके आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

 येत्या नवीन वर्षात जानेवारी मध्ये रिपाइं चा मुंबई प्रदेश चा मेळावा आयोजित करण्यात येणार असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले जी तारीख जाहीर करतील त्या तारखेला मुंबईचा मेळावा यशस्वी करण्याची जय्यत तयारी ठेवावी असे आवाहन रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले. 

केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा वाढदिवस दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्या तर्फे संघर्षदिन म्हणून साजरा करीत असून याचे औचित्य साधत नवनियुक्त जिल्हा कार्यकारीणी ची घोषणा नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे यांनी यावेळी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीतुन रिपब्लिकन पक्षात प्रवेश केलेले विजय डोळसे यांना रिपाइं च्या अनुशक्तीनगर विधानसभा युवक आघाडी च्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या