सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
शिर्डी :– विदेशातील कोवीड-१९ संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे राहाता तालुका प्रशासन अलर्ट झाले आहे. नागरिकांनी कोवीड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे. असे जाहीर आवाहन राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.
आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये कोविड-१९ या प्रादुर्भाव होऊ नये. याकरिता सार्वजनिक ठिकाणी वावरताना नाक व तोंडावर मास्क लावावा, गर्दीच्या ठिकाणी (जसे लग्नसमारंभ, राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम इ.) जाणे टाळावे, सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी व्यक्तींनी एकमेकांमध्ये कमीत कमी ६ फूट अंतर ठेवावे, आपले हात नियमितपणे साबण व पाण्याने धुवावेत अथवा सॅनिटायजरचा वापर करावा, आंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा. ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास, जुलाब इ. लक्षणे आढळून आल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रास भेट देऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण तात्काळ करून घ्यावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये, नेहमी खोकताना, शिंकताना नाक व तोंड स्वच्छ रुमालाने/ हात कोपरात दुमडून हाताने झाकून कोविड अनुरूप वर्तनाचे (C.A.B.) पालन करावे.
शासनाकडून व आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. प्रतिबंध हा उपचारापेक्षा अधिक चांगला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोवीड अनुरूप वर्तन व सूचनांचे पालन करावे. असे आवाहनही राहाता गटविकास अधिकारी जे.बी.पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय घोलप यांनीही केले आहे.


0 टिप्पण्या