Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु

 

नागरिकांनी मुख्यमंत्री महोदयांकडे द्यावयाचे अर्ज व निवेदने या कक्षात सादर करावेत- जिल्हाधिकारी संजय शिंदे

 सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

कोल्हापूर: जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील महसूल शाखेत मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कक्षाचे निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत. मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे सादर करावायाचे अर्ज, निवेदने व संदर्भ या कक्षात प्रत्यक्ष सादर करावेत, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले आहे.  

राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्या संदर्भात प्राप्त होणारी निवेदने, अर्ज, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय, मुंबई येथे स्विकारुन त्यावर कार्यवाही करण्याकरिता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरु करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या