Ticker

6/recent/ticker-posts

महामानवांची बदनामी करणार्‍यांविरोधात राष्ट्रद्रोहाच्या गुन्हयाची तरतूद असणारा कायदा करावा


मराठा सेवा संघाच्या महाअधिवेशनात ठराव संमत

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


परभणी :- महामानवांची बदनामी करणाऱ्या विरुद्ध राष्ट्रद्रौहाच्या गुन्ह्याची तरतूद असणारा कायदा तयार व्हावा असं मत मराठा सेवा संघाच्या समारोपीय महाअधिवेशातून एका ठरावा द्वारे करण्यात आले.

मराठा सेवा संघाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय महाअधिवेशनाचा समारोप आज रविवारी (दि.25) मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी महामानवांची बदनामी करणार्‍यांविरोधात राष्ट्रद्रोहाच्या गुन्हयाची तरतूद असणारा कायदा करण्यात यावा यासह एकूण 10 ठराव या महाअधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आले. 
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ह. भ. प. अच्युत महाराज दस्तापूरकर, नेताजी गोरे, विंग कमांडर टी.आर. जाधव, अरविंद गावंडे, अशोक महाले, गजानन काकडे, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, वर्षा धाबे हे उपस्थित होते. 
यावेळी शिक्षणसत्ता धर्मसत्ता, अर्थसत्ता, राजसत्ता, प्रचार -प्रसार -माध्यमसत्ता सत्ता काबीज करण्यासाठी सज्ज रहा असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्षा पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. खेडेकर म्हणाले की, शिक्षणसत्ता धर्मसत्ता, अर्थसत्ता, राजसत्ता, प्रचार -प्रसार -माध्यमसत्ता सत्ता  महत्त्व पूर्ण घटक आहेत.या ठिकाणी वर्चस्व ,सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.
सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे विशेषतः मोबाईल हे प्रगतीचे साधन बनले आहे.त्यामुळेच मोबाईल चा,सोसल मिडीयाचा वापर  आवर्जून झाला पाहिजे.
 शिक्षणात लैंगिक शिक्षण गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
दरम्यान विचारमंचावर  स्वागताध्यक्ष कांतराव देशमुख,  जिल्हाध्यक्ष विठ्ठल भुसारे, मधुकर मेहकरे, अरुण महाले, अरुण मराठे, मनोज आखरे, माधुरी भदाणे,सेवा संघाचे कार्याध्यक्ष  प्रा. अर्जुन तनपुरे, सोमनाथ दडके हे देखील उपास्थित होते. सुत्रसंचलन उदय भिसे तर आभार सुधाकर गायकवाड यांनी मानले. आजच्या सर्व सत्रांत प्रचंड गर्दीमुळे सभागृह अपुरे पडत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या