Ticker

6/recent/ticker-posts

स्व.बाबुराव पाटील गोरेगावकर (नाना) यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य किर्तन सोहळा

चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.८८८८११७९७५

हिंगोली -: विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे वडील स्वर्गीय बाबुरावजी पाटील गोरेगावकर(नाना) यांच्या पुण्यतिथी निमित्त न्यू हायस्कूल व कै. बाबुरावजी पाटील माध्यमिक विद्यालय गोरेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह. भ.प. कुमारी शिवलीलाताई पाटील यांच्या भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
  किर्तन सोहळ्यासाठी ह. भ.प. मृदंगाचार्य मंगेश महाराज गोरेगावकर , ह.भ. प.भजन सम्राट पंढरीनाथ महाराज कदम परभणीकर, ह. भ.प. विदर्भरत्न मनोहर महाराज कोठेकर हरिभाऊ वारकरी शिक्षण संस्था कवठा,ह.भ. प. भागवाताचार्य रामदास महाराज गोरेगावकर, 
ह.भ. प. मृदंगाचार्य गणेश महाराज गोरेगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटिल गोरेगावकर,माजी जिल्हापरीषद उपअध्यक्ष सुनिल पाटिल गोरेगावकर,युवा नेते रणजीत पाटिल ,डॉ.कुलदिप पाटिल , वरूण पाटिल,द्विज पाटिल  यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या