रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
परभणी : राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागीय कार्यालयांतर्गत 154 निवृत्त कर्मचार्यांना करार सेवेचे पैसे दररोज 25 हजार या प्रमाणे अदा करण्याचे आश्वासन विभागीय व्यवस्थापकांनी दिले आहे.
राज्य परीवहन महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांबरोबर बुधवारी (दि.21) शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांच्या नेतृत्वाखालील निवृत्त कर्मचारी व नव्याने भरती होणार्या उमेदवारांच्या एका शिष्टमंडळाने तपशीलवार चर्चा केली. विशेषतः 154 निवृत्त कर्मचार्यांच्या वेतनाचा प्रश्न प्रकर्षाने मांडण्यात आला. निवृत्त कर्मचार्यांना करार सेवेचे पैसे वितरित व्हावे, असा आग्रह देशमुख यांनी केला. त्यावेळी विभागीय व्यवस्थापकांनी करार सेवेचे पैसे दररोज 25 हजार या प्रमाणे अदा करण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच नव्याने भरती होणार्या उमेदवारांना टप्प्या टप्प्याने लवकरच नियुक्त्या दिल्या जातील, असेही आश्वासन दिले.


0 टिप्पण्या