Ticker

6/recent/ticker-posts

भूकंपविषयक आपत्ती व्यवस्थापनाची लातूर येथे बुधवारी रंगीत तालीम

▪️राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक राहणार उपस्थित

▪️महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांच्या सहभाग

▪️जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन


सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

लातूर : भूकंपासारख्या आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी करावयाच्या उपाययोजनांची रंगीत तालीम बुधवार, २८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी११ वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीत कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा, काय करावे व काय करू नये, याबाबतची माहिती एनडीआरएफ पथकामार्फत यावेळी दिली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी या रंगीत तालमीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या