Ticker

6/recent/ticker-posts

लोकशाही दिनात पाच अर्ज प्राप्त

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894


कोल्हापूर: जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये पाच अर्ज प्राप्त झाले आहेत.
        यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी सुहास गाडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, तहसिलदार रंजना बिचकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी सुदाम जाधव उपस्थित होते.
आजच्या लोकशाही दिनात महसूल विभाग 3, अधीक्षक भूमी अभिलेख 1 व जिल्हा उपनिबंधक कार्यालय-1 असे एकूण 5 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती तहसिलदार रंजना बिचकर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या