Ticker

6/recent/ticker-posts

युतीबद्दल आज प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे यांच्यात महत्वाची बैठक..

मोहन जगजेकर सोशल मीडिया प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य
मों-9022898029
 

मुंबई:- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात आज दुपारी १२ वाजता महत्वाची बैठक होणार आहे. युतीबाबत तसेच आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ठाकरे आणि आंबेडकर यांचे एकमत झाल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या समिकरणाचा उदय होईल, असे राजकीय माहिती असणाऱ्यांचे म्हणणे आहे.
तसेच या बैठकीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या