रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
दिल्ली :- शीख धर्माचे आद्य धर्मगुरू गुरू गोविंदसिंह यांचे सुपुत्र साहेबजादा जोरावर सिंह आणि साहेबजादा फतेह सिंह यांनी दिलेल्या बलिदानाचा दिवस वीर_बाल_दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने दिल्ली येथील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले.
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात बोलताना पंजाब व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ऋणानुबंधांचा उल्लेख अपरिहार्यच होता. पंजाब ही वीरांची भूमी आहे, आणि संत नामदेव महाराज यांना मानणारा मोठा वर्ग पंजाबमध्ये आहे. शहीद भगतसिंह यांच्यासोबत शहीद झालेले राजगुरू हेदेखील महाराष्ट्रातील होते. आपल्या देश आणि धर्मासाठी कमी वयात शहीद झालेल्या साहेबजादांची आठवण कायम मनात ठेवून येणाऱ्या पिढ्यांना त्यातून निश्चितच प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा याप्रसंगी बोलताना व्यक्त केली.
यासमयी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंह पुरी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान आणि अन्य मान्यवर आवर्जून उपस्थित होते.


0 टिप्पण्या