Ticker

6/recent/ticker-posts

संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांची सावली :

खासदार रामदास तडस

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

नवी दिल्ली : संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराज यांची सावली असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी आज येथे केले. 
            कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात सतं जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात श्री तडस बोलत होते. याप्रसंगी राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित होते. श्री तडस यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थि तांनी प्रतिमेस पुष्प अर्पण आदरांजली वाहिली.
 श्री तडस पुढे म्हणाले, संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम यांच्या जवळील टाळकऱ्यांपैकी एक होते. संत जगनाडे महाराज जन्मापासूनच संत विचाराचे होते. त्यात त्यांना संत तुकाराम महाराज यांची साथ लाभल्यामुळे त्यांच्या संत वृत्तीचा अधिक विकास झाला. संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम यांची सावली होते. त्यांना संत तुकाराम महाराजांचे सर्वच अभंग मुखोद्गत होते. त्यांनी या अभंगाचे पुनर्लेखन केले. लोकोउपयोग आणि परमार्थ कसा करावा यासंदर्भातील काही अभंग त्यांनी स्वत: लिहिले असल्याचे श्री. तडस यांनी यावेळी सांगीतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या