मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256
उस्मानाबाद :- धाराशिव :- 5 डिसेंबर धाराशिव जिल्हा तालुक्यातील संपत यांचे स्वप्न होते की, त्यांचे स्वतःचे मंडपाचे दुकान असावे. यांनी सन २००१ ते २००५ या काळात दुसऱ्याच्या मंडप दुकानात काम केले. त्यानंतर कुटुंबियांच्या मदतीने घरातील दागिने विकून एक छोटी टमटम गाडी घेतली. सन २००८ ते २०१४ या काळात त्यांनी धाराशिव ते वडगाव सिद्धेश्वर दरम्यान गाडी चालवली, तसेच रोडवरील खड्डे बुजविण्याचे काम देखील केले.
पैसे साठवून २०१४ साली त्यांनी छोटेसे मंडप दुकान सुरू केले. जेव्हा मंडप व्यवसाय अधिकाधिक गतिशील होण्याची वेळ आली तेव्हा लॉकडाऊन सुरू झाले. अर्थात लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. मात्र ते पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याचा प्रयत्न करत होते, मात्र भांडवलासाठी पैशांची अडचण होती.
अशा वेळी PMEGP योजनेची माहिती त्यांना मिळाली.नतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर कार्यालयाच्या मदतीने त्यांनी कर्जासाठी बँकेत फाईल टाकली आणि त्यांना ५,००,००० रुपयांचे कर्ज मंजूर झाले.
आज ते आत्मनिर्भर होऊन स्वतः मंडप दुकानाचे मालक आहेत. मिळालेल्या रकमेतून ते लोखंडी अँगल्सचा सेटअप तयार करणार आहेत. त्यांच्या मते तयार होणाऱ्या नवीन साहित्यामुळे उत्पन्नात दुपटीने वाढ होण्याची त्यांना अपेक्षा आहे.
आत्मनिर्भर होण्यासाठी PMEGP योजनेच्या माध्यमातून विविध व्यवसाय आपल्याला सुरू करता येतात किंवा व्यवसाय वाढवताही येतो. अनेक नागरिक याचा लाभ घेत आहेत.
'आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर धाराशिव' अंतर्गत जिल्ह्यातील इतरांनी सुद्धा सदरील योजनेचा लाभ घ्यावा


0 टिप्पण्या