महाराष्ट्र विधानपरिषदेत पांच आमदार हे उच्चशिक्षित असावेत.असा हेतू ठेवून पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चालू आहे.यात पदवीधर शिक्षक मतदार आहेतच .पण उमेदवार कोण ? यात आधिकतम उमेदवार आहेत शिक्षण संस्थाचालक .आणि मतदार आहेत कामगार,नोकर, शेतकरी, व्यापारी .बकरी प्रचार करते कि, आमच्या वाघाला,लांडग्याला मतदान करा.हाच वाघोबा,हाच लांडगा अत्याचार करतो, शिक्षक आणि पदवीधर आत्महत्या करतो.याचा विचार करा.मग प्रचार करा आणि मतदान करा.
शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षक यांचा संबंध आहे वाघ बकरी सारखा.ते जेंव्हा समोरासमोर येतात तेंव्हा त्यांचेकडे बारकाईने लक्ष दिल्यास ,कळते.पदवीधर आणि शिक्षक उच्चशिक्षित असूनही त्या संस्थाचालकापुढे कसा वर्तन करतो?पाठीचा कणा किती वाकवतो?नम्रतेची ऐशीतैशी ! नव्हे ,ही तर भयग्रस्त कैची!
नवापूर तालुक्यातील झेडपी सदस्य गावीत यांची शिक्षणसंस्था.त्यात चौधरी हे मुख्याध्यापक होते.ज्यांनी ही आर्थिक वसुली करुन संस्था मोठी केली.पण जेंव्हा ते ताठ मानेने बोलू लागले तेंव्हा म्हणे , चौधरी सर तुम्ही नोकरी सोडा.मी दुसरा मुख्याध्यापक भरणार आहे.मुख्याद्यापक भरणे म्हणजे,पंचवीस लाखाची तुमडी भरणे.चौधरी ऐकत नाहीत म्हणून त्यांचेवर एका मुलीकरवी विनयभंगाचा आरोप केला.ती मुलगी नाही म्हणत असतांना पोलिस केस,कोर्ट खटला चालवला.दहा वर्षांनंतर चौधरी दोषमुक्त आढळले.तरीही पुन्हा पदावर घेतले नाही.दहा वर्षे त्या शिक्षकाची हालत त्यांना विचारा.मग, संस्था चालकाला मतदान करा.
असाच प्रकार नटावदकर संस्थेत झाला.सुर्यवंशी यांना कोर्टाने आदेश देऊनही त्यांना कामावर घेतले नाही.कंटेम्म्ट ऑफ कोर्ट केले.तर संस्था चालकांनी गुन्हा कबूल करून दंड भरला पण सुर्यवंशी यांना नोकरीवर घेतले नाही.त्या सुर्यवंशी ची हालत पंदरा वर्षात कशी झाली?हे त्यांना विचारा मग संस्था चालकाला मतदान करा.
धुळ्याच्या अभय संस्थेचे शिक्षकांना नाशीक येथे येऊन बंगल्याची साफसफाई चेयरमनने करवून घेतली.मला कळले तेंव्हा मी चेयरमनला झापले,का रे हरामखोरा!तू शिक्षण संस्था चालवतोस कि शिक्षकांना गुलाम बनवतोस? त्या शिक्षकांना विचारा,त्यांचे पाठीचे मणके किती अंशांनी झुकलेत?नंतर संस्था चालकाला मतदान करा.
जळगाव मधील नामांकित संस्थेचे प्राचार्य राणे.रिटायर झाल्यावर पंदरा महिने पेन्शन,फंड,सेटलमेंट रक्कम दिली नाही.अर्ज फाटे,उपोषण सर्वच केले.एकाही शिक्षकाने किंवा मुख्याध्यापकाने किंवा प्राचार्यांने साथ दिली नाही.एकानेही हिंमत दाखवली नाही कि,यांचे सेटलमेंट पेमेंट का देत नाहीत? कारण यांची अवस्था बकरीपेक्षा गलीतगात्र करून ठेवलेली असते.शिक्षक विरोध करूच शकत नाही,रडू शकत नाही.वाघ ,लांडग्याच्या कैचीत बकरी सापडली तर ही अवस्था होते.आधी मुंडी खावी कि फर्रे ,ही तुमची मेहरबानी! इतकीच प्रार्थना करू शकते.
चोपडा येथील बोरोलेची संस्था. जाधव मानसशास्त्रात पीएचडी झालेला माणूस.त्यांचे रीतसर सिलेक्शन झाले असूनही तब्बल अकरा वर्षे कामावर रूजू करून घेतले नाही.हायकोर्टाने आदेश दिला तरीही अर्ज विनंती,उपोषण करावे लागले.आम्ही जागृत जनमंच ने मध्यस्थी केली.दडपण आणले.संस्थेची बाराखडी काढली.तेंव्हा त्यांना कामावर रूजू केले.एक उच्चशिक्षित शिक्षक.पीएचडी झालेला प्रोफेसर.आणि ही हालत.विचारा ,त्या जाधवांना .नंतर संस्था चालकांना मतदान करा.
शिक्षक हा आपल्या लेखी गुरू असतो.पण संस्था चालकांच्या लेखी एक बकरी असतो.पाहिजे तेंव्हा नरडी दाबता येते.रक्त पिता येते.शिक्षकांचे रक्त पिऊनही एकादशी सांगतो. भरती करतांना डोनेशन.अप्रोव्हल साठी पुन्हा डोनेशन.रिटायर झाल्यानंतर सुद्धा सेटलमेंट साठी एक पगार द्यावा लागतो.पाहिजे तेंव्हा हाकलतात.पाहिजे ते काम लावतात.खाजगी काम.निवडणुकीत प्रचार.रात्री पाकिट वाटप.इतर शिक्षकांकडून दरमहा वसुली.विकास निधीची पावती.असे पाप केले जाते किंवा करवून घेतले जाते.महाराष्ट्र विधानसभेत, विधानपरिषदेत असे अनेक आमदार आहेत कि,त्यांना प्रचार करावा लागत नाही.त्यांच्या पन्नास साठ शाळा आहेत.तेच मास्तर प्रचार करतात.तेच मतपत्रिका व पाकिटे वाटतात.तेच मतदारांना गाडीत कोंबून आणतात.काही आमदारांच्या शिक्षणसंस्थांची आणि नोकरांची संख्या ही एक आमदार निवडून आणण्यासाठी पुरेशी असते.दीड दोन लाख मतदार.तितके तर आमदाराचे नोकर आहेत.कोणी शहाणा,दिडशहाणा मतदाराची गरजच पडत नाही.असे हे आमदार लोक प्रतिनिधी आहेत कि लोकांचे मालक?
हे आमदार जरी लोकशाही सांगून निवडून आले असले तरीही ते स्वताला राजे समजतात.आहेतच.तो जितका वेळा आमदार झाला तितके पट त्याला पेन्शन मिळते.फक्त पांच वर्षात फुल पेन्शन.एक वर्ष आमदार बनला तरीही पेन्शन.नव्हे तो काढून घेतो.तोच तर ठरवतो, पेन्शन कोणी किती घ्यावे.पण पंचवीस तीस वर्षं नोकरी करणाऱ्याला पेन्शन नाही.का? येथे पैसा अपुरा पडतो.पण आमदाराच्या पेन्शन मानधन,कमीशन साठी अपुरा पडत नाही.ही लोकशाही आहे कि लुटशाही? फडणवीस विधानसभा अधिवेशनात म्हणाले कि,राज्य सरकारच्या नोकरांना पेन्शन देता येणार नाही.शिंदे म्हणाले कि, पेन्शन का आणि कशासाठी ,किती द्यावे,याचा अभ्यास करू.तुम्ही गाजर मागतात.ते पाला दाखवतात. हे चूक कि बरोबर ?याचा विचार करा.नंतर मतदान करा.सोनवणे असोत कि तांबे असोत कि हिरे , यांना हे का खटकले नाही? तांबे,थोरात, फडणवीस,पवार, पटोले, ठाकरे आमदारकीचे पेन्शन घेणार आहेत कि सोडून देणार आहेत? त्यांना विचारा. खात्री करा.मग मतदान करा.
शिक्षकांनो,पदवीधरांनो!आधी तुम्ही तुमचा स्वाभिमान शाबूत ठेवा, तरच आम्ही तुमचा अभिमान बाळगू.तुम्ही ताठ मानेने जगलात तर आम्ही हात जोडून नमस्कार करू.पण तुम्हीच वाघ,लांडगा,कोल्हा निवडून देत असाल तर तुम्हाला कोणताही न्यायाधीश वाचवणार नाही.कोणताही ईश्वर वाचवणार नाही.बकरीच लांडग्याकडे पळत असेल तर गुराखी तरी काय करणार? बकरीच लांडग्याला नेता मानत असेल तर शिवराम पाटील, ईश्वर पाटील कसे वाचवणार? आधी याचा विचार करा .मग मतदान करा.
.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव


0 टिप्पण्या