Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक नेत्र शस्त्रक्रिया विभाग कार्यान्वित

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

परभणी: सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक नेत्र शस्त्रक्रिया विभाग आजपासून कार्यान्वित करण्यात आला असून, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जयश्री यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांच्यासह जिल्हा नेत्र विभागाचे अधिकारी, परिचारिका उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील या विभागासह गंगाखेड आणि सेलू येथेही अत्याधुनिक नेत्र शस्त्रक्रिया विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून उभारण्यात आलेल्या नेत्रविभागाच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागाचे काम करण्यात आले आहे. यापूर्वी दुसऱ्या इमारतीत नेत्र शस्त्रक्रिया विभाग कार्यरत होता. आता तो जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात कार्यरत झाला आहे. याशिवाय जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी दिव्यांग मदत कक्षाची पाहणी केली. त्याबाबत लवकरच बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या