लिंगोजी कदम :-जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
मो 9689821132
किनवट -: बळीराम पाटील महाविद्यालय किनवट राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीरातील विद्यार्थ्यांनी मौजे मांडवा येथे विशेष निवासी शिबिराच्या चौथ्या दिवशी गावात स्वच्छता शिबिर व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले .
दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळच्या सत्रात विद्यार्थी गावामध्ये गल्लीगल्लीत जाऊन स्वच्छता शिबिराचे आयोजन केले तसेच गावातील नाल्या साफ केले प्लास्टिक कचऱ्याचे विल्हेवाट लावले विद्यार्थ्यांनी याप्रसंगी "स्वच्छतेचे महत्व " " बेटी बचाव बेटी पढाव " "'पर्यावरणाचे संदेश " देत गावात प्रभात फेरी काढून जनजागृती केली यामध्ये बजरंग जेपुरकार , आश्विनी झाडे ,तुषार राठोड ,जानवी गित्ते ,साक्षी नाईकवाड , स्नेहा धनवे , आकाश मांजरमकर ,निर्भय चव्हाण , निखिल खराटे , शुभांगी वाघमोडे , वैशाली राठोड , पुजा राठोड , पोर्णिमा शिंदे , रफीक शेख , सम्राट गवळे , आदि विद्यार्थी उपस्थित होते .
दुपारच्या सत्रात प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रणाली यलपुलवार या विधार्थीनीच्या स्वागत गीतानंतर उपप्राचार्य डॉ . गजानन वानखेडे यांनी कुष्टरोग्यांना मुख्य प्रवाहात आणणारे बाबा आमटे यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच तन्मय गजानन वानखेडे या छोट्याशा इयत्ता चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी संतांची भूमी सेंट फ्रान्सिस या संतांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून त्यांनी आपले सुंदर असे मनोगत व्यक्त केले या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला राष्टीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. शेषेराव माने , राष्ट्रीय सेवा योजनेचे कायक्रम अधिकारी प्रा. पुरुषोतम येरडलावार महिला कार्यक्रमअधिकारी प्रा. सुलोचना जाधव , गजानन गित्ते , काशिनाथ पिंपरे ,मुक्त विद्यापिठाचे सुरेश अडागळे , प्रदिप जाधव , सुधीर पाटील आदि उपस्थित होते . कायक्रमाचे सुत्रसंचलन पोर्णिमा शिंदे हिने केले . साक्षी नाईकवाडे या विद्यार्थिनीनी आभार मानले .
0 टिप्पण्या