चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-आज-काल महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे भवितव्य धोक्यात आहे .राज्यातील कित्येक शाळा सध्या विद्यार्थ्यांचे पटसंख्या कमी असल्यामुळे बंद पडत आहेत. कारण प्राथमिक शाळेतील असुविधांमुळे
पालकांचा कल हा जास्तीत जास्त प्रायव्हेट इंग्लिश स्कूल या शाळांकडे वाढलेला दिसून येत आहे .परंतु
याला अपवाद मांगी येथील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक श्री कौले गुरुजी ,शिक्षिका पोतदार मॅडम व त्यांचे सहकारी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासूनच इतर विषयांप्रमाणेच इंग्रजीचेही धडे शिकवायला सुरुवात करत त्यांच्याकडून इंग्रजीचा
अभ्यास करून घ्यायला सुरुवात केली .व त्यामुळेच आज चौथीतील मुले ही एखाद्या इंग्लिश मीडियम स्कूल ला लाजवतील अशी इंग्लिश बोलत आहेत,.
आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजी शाळा तपासणी पथक हे ,मांगी येथील प्राथमिक शाळेमध्ये दाखल झाले असताना त्यांच्यासमोर इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कु.स्वरा अवचर व इयत्ता चौथीतील विद्यार्थी राजवर्धन बनसोडे यांनी लाकूडतोड्याची गोष्ट ही इंग्रजी मध्ये बोलून सादर करून दाखवले.
या विद्यार्थ्यांच्या तोंडातून येणारे इंग्रजी शब्द हे इतके तंतोतंत होते हे बघून
वार्षिक शाळा तपासणीस आलेले पाथकातिल अधिकारीही थक्क झाले.
व याबद्दल त्यांनी त्यांच्या वर्ग् शिक्षिका सुवर्णा महामुनी ,मुख्याध्यापक कौले गुरुजी, व शाळेतील शिक्षक वृंदांचे मनापासून आभार व्यक्त केले.
प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी मांगी शाळेसारखी संकल्पना राबविल्यास नक्कीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना "अच्छे दिन "येतील असा विश्वास केंद्रप्रमुख गटकळ साहेब ,पिसाळ मॅडम ,दूधे मॅडम यांनी विश्वास व्यक्त करत
गौरोऊदगार काढले.
यावेळी चौथीच्या वर्गशिक्षिका सौ सुवर्णा महामुनी मॅडम ,मुख्याध्यापक कौले गुरुजी ,देमुंडे मॅडम ,पवार मॅडम यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते .
0 टिप्पण्या