रोजगार सेवक सिध्दार्थ खैरे यांचा दणदणीत विजय
चित्रा न्युज ब्युरो
मारेगाव : "गावकरी ते राव ना करी" या ऊक्तीप्रमाणे मारेगाव तालुक्यातील वनोजा (देवी) येथील जनतेने सरपंचाच्या मनमानी कारभारांचा आणि सरपंच पतिच्या मनसुबा उधळून लावत गावकऱ्यांनी विरोध करीत अखेर गावकऱ्यांनी रोजगार सेवकांच्या बाजुने ऐकमतांनी मतदान करुन मिळवून दिला न्याय या विशेष ग्रामसभेला गावकऱ्यांचा रोष पाहुन भितीपोटी सरपंचांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या मागविल्या होत्या तब्बल दोन गाड्या पोलीसांच्या कडेकोट बंदोबस्तात गावकऱ्यांनी शांततेत ग्रामसभा पार पडली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की दि.04 -01- 2025 ला पं.स.मारेगाव मार्फत आलेल्या पत्रानुसार रोजगार सेवक कमी करण्यात येण्याबाबत व ग्रा.पं.शिपाई निवृत्त झाल्यामुळे नविन शिपाई घेण्याची माहिती देण्याबद्दल या दोन विषयांना अनुसरून 13-01-2025 रोजी विशेष ग्रामसभा लावण्याचे ठरवले होते. ती विशेष ग्रामसभा काल दि.13-01-2025 रोजी सभेचे नियोजन झाले व अकरा वाजता ग्रामस्थांची गर्दी गोळा होण्यास सुरुवात झाली पण सचिव साहेबांची प्रकृती बरी नसल्याने ते ग्रामसभेला उपस्थित राहू शकत नसल्याने सरपंच मॅडम सौ.डिमन टोंगे यांनी गट विकास अधिकारी साहेब यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता गटविकास अधिकारी यांनी आपल्या येथिल अंगणवाडी सेविका, तलाठी किंवा जि.प.शाळा येथिल शिक्षक यापैकी कोणाला तरी सभा प्राधिकृतचे बोला व इतिवृत्त लिहण्याकरित त्यांना आमंत्रित करा सरपंच मॅडमने अंगणवाडी सेविका सोबत ग्रामसभेचे प्राकृतिक स्थान घेण्याचे बोलले असता अंगणवाडी सेविका यांनी मला जमनार नाही आपण शिक्षकांशी संवाद साधून बघा नंतर शिक्षकांशी संवाद साधला असता जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक चटप यांनी तसेच गटविकास अधिकारी यांनी इतिवृत्त लिहण्यासाठी भ्रमणध्वनी द्वारे गटविकास अधिकारी भिमराव व्हनखडे साहेब पंचायत समिती मारेगाव यांनी जि.प.शाळा वनोजा देवी येथील मुख्याध्यापक श्री.अशोक चटप सर यांना आज होणाऱ्या विषेश ग्रामसभेचे प्राधिकृत आपण करावे असा संवाद झाला होता.गट विकास अधिकारी यांच्या शब्दांना मान देत श्री.चटप सर यांनी ग्रामसभाला प्राकृतिक करिता होकार दिला.ग्रामसभेची सुरूवात झाली अध्यक्ष मॅडम नी प्रोसेडिंग बुक वर ग्रामसभेचा विषय मांडला होता पं.स.मार्फत आलेल्या जमावाद्वारे रोजगार सेवक याला कमी करण्यात येण्याबाबत असा विषय मांडला व शिपाई निवृत्त झाल्यामुळे नविन शिपाई घेण्याची माहिती देण्याबद्दलचा होता. पण विषय आला तो विषेश ग्रामसभेच आयोजन करून काढायचा की यावर चर्चा करूनच रोजगार सेवक सिध्दार्थ खैरे यांना काढायचे पण ग्रामस्थांना विचारात न घेऊन संख्या पाहून डायरेक्ट जमावाद्वारे काढण्यात येत असल्याचा विषय मांडला व डायरेक्ट चर्चा न करता ग्रामसभेच्या अध्यक्ष मॅडम यांनी विषय मांडून प्रोसेडिंग रजिस्टर ग्रामस्थांना सह्या करण्यास सुपुर्द केले पण ग्रामस्थांनी प्रोसेडिंग बुक वरिल विषय पाहून आपण जर सह्या केल्या तर रोजगार सेवक काही चुक नसताना व काही सबळ पुरावा नसताना काढण्यात येईल हा त्याच्या सोबत अन्याय होणार करिता ग्रामस्थांनी अध्यक्ष मॅडम यांना आपण विषय चुकीचा मांडला आहे व आपण आम्हा जनतेला सह्या प्रोसेडिंग बुक वर सह्या करण्यास सांगता आणि आम्ही सह्या केल्याकी लगेच तो रोजगार सेवक काढून दिल्या जाणार हा त्यांचा सोबत अन्याय होईल म्हणून आम्ही सह्या करणार नाही यावरून थोडी ग्रामसभेत आक्रोश होण्यास सुरुवात झाली होती म्हणून अध्यक्ष आपले अध्यक्ष स्थान सोडून एक ते दिड तास ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन बसल्या व पोलीसांना पाचारण केले. ग्रा.पं. कार्यालयात बसून आज ची सभा तरकूब करण्यावर चर्चा सुरू होती ते ऐकूण जनतेने सभा तहकूब होणार नाही आपल्याला सभा घ्यावी लागेल नंतर एक ते दिड तासानी उपसरपंच यांनी सर्वांना शांत बसण्याकरिता विनंती केली व सभेला परत दिड तासानी सुरूवात करण्यात आली होती सर्व प्रथम प्रोसेडिंग बुक वर चटप यांनी सभेचा विषय मांडला व कोरम पुर्ण झाल्यावर समोरिल विषय या वर चर्चा करण्यात येणार असे सुचवले व प्रोसडिंग बुक वरिल सह्यामध्ये कोरम 100 च्या वरिल सह्या असल्याने कोरम पुर्ण झाला नंतर विषयाची सुरूवात करण्यात आली होती प्रथम विषयावर चर्चा करण्यात आली रोजगार सेवक यांना कामावर ठेवायचे किंवा नाही ठेवायचे त्यावर एक तास चर्चा चालली व कश्याप्रकारे तर सर्वानूमते सह्या आहेत त्यांचेच वैयक्तिक मौखिक मत घेण्यात आली त्यापैकी 86 मतदान रोजगार सेवक यांना कामावर ठेवायचे आहे . 01 मत कामावर नाही ठेवायचे तर 22 मत तटस्थ मध्ये असल्याने प्रोसेडिंग रजिस्टर वरिल आजच्या विशेष सभेचे विश्लेषण गट विकास अधिकारी मारेगाव यांना सांगितले व त्याचा सांगण्याप्रमाणे रोजगार सेवक श्री. सिध्दार्थ खैरे यांना कायमस्वरूपी कामावर रुजू करण्यात येत आहे असे इतिवृत्त (शेअरा) मांडण्यात सांगितला. त्या इतिवृत्त खाली विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षा सौ. टोंगे मॅडम व आजच्या सभेत सचिव म्हणून नेमलेले श्री.चटप सर यांनी सह्या करून रोजगार सेवक सिध्दार्थ खैरे यांना कायमस्वरूपी रुजू करण्यात आल्याची ग्रामसभेत घोषणा केली.या विषेश ग्रामसभेला ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी,सदस्य सुधाकर धांडे,सदस्या रेखाताई वनकर, सदस्या सुष्माताई ढोके,सदस्या राधाताई झाडे,सदस्या वृषालीताई टोंगे, माजी सरपंच गुलाबराव बरडे व युवा प्रशिक्षणार्थी आरती मत्ते तसेच सुरूवातीला 175 तर सभेला उशीर होत असल्याने काही ग्रामस्थ परत गेल्यानंतर ही सभा संपेपर्यंत 100 च्या वरिल संखेनी ग्रामस्थांची उपस्थिती होती. ग्रामसभेतून विजय झाल्यामुळे रोजगार सेवक श्री.सिद्धार्थ खैरे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.सभेला वेळ झाल्याने एका विषयावरच कालची सभा समाप्त करण्यात आली असून ग्रामसभेचा दुसरा विषय ग्रा.पं.शिपाई निवृत्त झाल्यामुळे नविन शिपाई घेण्याची माहिती या बद्दलची ग्रामसभा कधी होणार याकडे वनोजा (देवी) येथील ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहेत.
0 टिप्पण्या