Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक कार्यकर्ते गंगाधर गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.


                                  
लिंगोजी कदम :- जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी नांदेड
मो 9689821132
                                       
हिमायतनगर -: तालुक्यात सामाजिक क्षेत्रात वेळोवेळी आपले योगदान देत कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर गायकवाड यांचा वाढदिवस हिमायतनगर तालुक्यात शहरात ठीक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध संघटनेचे, पक्षाचे व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
  याविषयी सविस्तर वृत्त असे की दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार, महाराष्ट्र पर्व लाईव्ह चे मुख्य संपादक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे हिमायतनगर तालुका उपाध्यक्ष, माहिती अधिकार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष मा. गंगाधर गणपत गायकवाड यांचा वाढदिवस हिमायतनगर शहरात ठीक ठिकाणी त्यांच्या चाहत्यांनी व सहकार्यांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन व केक कापून साजरा केला व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
     गंगाधर गायकवाड यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. त्यानंतर ते हिमायतनगर येथे आले असता प्रथमता हिमायतनगर शहरात वंचित बहुजन आघाडीच्या टीम कडून गंगाधर गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पहार घालून व पेढे चारून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ कार्यकर्ते गोविंद गोखले, ज्येष्ठ कार्यकर्ते पांचाळ, माजी तालुकाध्यक्ष डॉ.रविराज दूधकावडे, विशाल खिल्लारे, लोकस्वराज्य आंदोलनाचे तालुका अध्यक्ष धोंडोपंत बनसोडे, महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज चे संपादक विजय वाठोरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
     त्यानंतर हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिरामध्ये गंगाधर गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र व इतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना पुष्पहार घालून व केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
   सामाजिक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते तथा महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्कचे मुख्य कार्यकारी संपादक मा. श्री गंगाधर गायकवाड दिघीकर यांचा वाढदिवस समाज उपयोगी उपक्रम राबवुन,मोठ्या उत्साहात मित्र परिवाराकडून साजरा करण्यात आला.यावेळी विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री शांतीलाल श्रीमाळ,धोंडोपंत बनसोडे पत्रकार तथा लोकस्वराज्य आंदोलन तालुकाध्यक्ष,महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज चे संपादक विजय वाठोरे,सामाजिक कार्यकर्ते दिनेश राठोड,मराठा साम्राज्य संघ चे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना भाऊ शिंदे,समाजसेवक लक्ष्मण डांगे,देवानंद गुंडेकर,राम चिंतलवाड,माधव कदम,प्रशांत राहुलवाड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
    गंगाधर गायकवाड यांचा वाढदिवस हिमायतनगर शहरात ठीक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना हिमायतनगर शहरातील सामाजिक क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, पत्रकारिता क्षेत्र, राजकीय क्षेत्र तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सोशल मीडियावरील व्हाट्सअप,फेसबुक यासह फोनद्वारे, मेसेज द्वारे सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या