Ticker

6/recent/ticker-posts

लोहगाव केंद्र शाळेत पैठणच्या दोन शिक्षक सेना रत्नांचा भव्य सन्मान

चित्रा न्युज प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर :-पैठण तालुक्यातील शिक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलेले  दोन शिक्षक सेना रत्न; ज्यांना गेल्या आठवड्यात मोठ्या उंचीच्या पदावर काम करण्याची जबाबदारी मिळाली आहे, असे नवनियुक्त राज्य प्रसिद्धीप्रमुख *मा. श्री महेशराव लबडे सर* व छत्रपती संभाजीनगरचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष *मा श्री अमोलराजे एरंडे सर* यांचा संपूर्ण लोहगाव केंद्रातील शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने तसेच लोहगाव ग्रामपंचायतच्या वतीने व लोहगाव शाळेच्या दोन्ही व्यवस्थापन समितीच्या वतीने अत्यंत भव्य दिव्य सत्कार संपन्न झाला_. 
_*लोहगाव केंद्रांतर्गत शाळेच्या शिक्षकांनी  देखील दोन्ही मान्यवरांचा यथोचित सत्कार करून भरभरून  शुभेच्छा व आशीर्वाद दिले*_.

_यावेळी बोलताना राज्य  प्रसिद्धीप्रमुख *मा.श्री महेशराव लबडे* यांनी ग्वाही दिली की येत्या काळात आपल्या लेखणीतून शिक्षकांच्या व शिक्षणातील समस्यांना  वाचा फोडून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न राज्यस्तरावरून  सोडवण्यासाठी सदैव पुढाकार घेऊ. 

त्यानंतर शिक्षक सेनेच्या वतीने शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप केले_.

_यावेळी लोहगावचे उपसरपंच मा.श्री दिलीप नाना जगताप, ग्रामपंचायत सदस्य नामदेव औटे, प्रशाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण भाऊ इथापे, प्राथमिक शाळा अध्यक्ष सचिनभाऊ बोरुडे, ब्रह्मगव्हाण गावचे युवा नेतृत्व  विजय केदारे , लोहगाव प्रशाला चे मुख्याध्यापक मा श्री उद्धव गरड सर, सहशिक्षक गणेश दादा गायकवाड, सुनील भागवत सर, सीके हिवराळे सर, अरविंद उमाळे सर, राजेंद्र कुमार सरदार सर, केंद्राचे केंद्रप्रमुख मा श्री मनोज कुमार सरग सर यांचे प्रतिनिधी तथा गाढेगाव शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री एकनाथ लाटे सर, सहशिक्षक दर्शन बोरसे सर, तारू पिंपळवाडी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री बाळासाहेब जगदाळे सर, सहशिक्षक धनंजय साखरे सर, अशोकजी पाटील सर, दिनापूर शाळेचे मुख्याध्यापक मा श्री महावीर इंदोरे सर, मा श्री विजय राठोड सर, मा. श्री स्वप्निल बनकर सर, शेवता शाळेचे पदवीधर शिक्षक  मा.श्री संतोषजी केकते सर, तोंडोली शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री कृष्णा बोरुडे सर, लामगव्हाण शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री बबनजी वाकळे सर, श्रीमती शीतल मुरकुंदे मॅडम, ढाकेफळ शाळेच्या मुख्याध्यापिका घुले मॅडम, सहशिक्षक मा. श्री कैलास ढोले सर, मा. श्री संभाजी शिंदे सर, नदीकाठवस्ती शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री हनुमंत दराडे सर, ब्रह्मगव्हाण  शाळेचे मुख्याध्यापक श्री कैलास मिसाळ सर, केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खालिद शेख सर, बोटूळे सर, बडक मॅडम, पाचनकर मॅडम, मनीषा त्रिभुवन मॅडम, दहिवतकर मॅडम, दहिवतकर मॅडम शेख मॅडम डांगे मॅडम .. आदी मान्यवर उपस्थित होते_.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या