भंडारा :- भंडारा जिल्हा साकोली तालुक्यातील मौजा एकोडी येथे एका इसमाचा तलावात तोल जाऊन बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.श्री.दसरत नागवल सोनकुसरे वय ५१ वर्षे ( रा. एकोडी ) असे मृतकाचे नाव आहे.त्यांना मागील काही दिवसापासून मिरगीचा त्रास होता. शनिवारला दुपारच्या सुमारास ते अचानक घरून निघून गेले.हा प्रकार लक्षात येताच घरातील लोकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. दुसऱ्या दिवशी रविवारला येथील तलावाच्या पाळीवर त्यांच्या चपला आढळून आल्याने लोकांच्या मनात तर्कवितर्क सुरू घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच लोकांनी एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती पोलीस विभागाला मिळताच, पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.शेवटी गोताखोरांच्या मदतीने तलावात उतरून शोधा शोध केली असता दसरथ यांचा मृतदेह आढळला. मृतदेह सवविच्छेदनासाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, आई , वडील असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने सोनकुसरे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुंभरे ,पोलीस नायक भूषण गजभिये, शिपाई योगेश वैरागडे , पोलीस नाईक प्रतीक बोरकर हे करीत आहेत.
0 टिप्पण्या