प्रतिनिधी चित्रपट न्युज
चंद्रपूर : वंचित बहुजन युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वार्ड अध्यक्ष गौतम हराळ ह्यांचेवर आंबेडकर भवन मुंबई परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला असून वंचित बहुजन युवक आघाडी यांच्या जाहीर निषेध करते. २७ मे रोजी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश च्या कार्यकर्त्यांची बैठक होती. मुंबईत सध्या वंचित बहुजन आघाडी च्या जोरदार सभा होत आहेत. पुढील सभा ही ३ जून रोजी होणार आहे त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी ठिक ६.३० ते ७ च्या दरम्यान वंचित चे मुंबई युवा प्रदेश अध्यक्ष श्री. परमेश्वर रणशुर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर आंबेडकर भवन परिसरात चार अज्ञातखोर इसमांनी लोखंडी रॉड, आणि तलवार, चोपरने जीवघेणा हल्ला केला आहे. जीवघेणा हल्ला प्रकरणात आरोपी आणि सूत्रधार जगदीश गायकवाड टोळीला अटक करण्याची मागणी आम्ही करीत करत आहोत. जगदीश गायकवाड ह्याचे मुलाचा वाढदिवस होता त्याच दिवशी हा हल्ला करण्यात आला आहे. CWC ह्या युट्युब चॅनेल चा संचालक सुनील नागवंशी ह्याने हल्ल्या नंतर आनंद व्यक्त करणारे स्टेस्ट टाकले आहे. हा हल्ला परमेश्वर रणशूर वर नसून हा आंबेडकर भवन वरील हल्ला आहे. पक्ष नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द बोलून आंबेडकर घराण्या संबंधी अपशब्द बोलणाऱ्या जगदीश गायकवाड आणि टोळी ह्या हल्यात सहभागी असल्याचा आरोप युवा आघाडीचा आहे. हल्ला वेळी आंबेडकर भवन परिसरात असलेले सीसीटीव्ही तपासून तसेच त्यावेळी परिसरात ऍक्टिव्ह मोबाईल नंबर देखील तपासण्यात यावे. ह्या बाबतीत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याद्वारे गृह मंत्री ह्यांना निवेदन देण्यात आले. त्याद्वारे आम्ही अशी मागणी करतो की, ह्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर ह्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी. तसेच हल्ला प्रकरणात तातडीने आरोपींना अटक व्हावी, हल्ल्याचा मास्टर माईंड असलेल्या जगदीश गायकवाड आणि टोळीला अटक करण्यात यावी, त्यांचेवर कलम ३०७ सह संघटित गुन्हेगारी चे कलम (मकोका) लावून त्याचे अवैध संपत्ती बाबत महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीने दिलेल्या तक्रारी नुसार सीबीआय आणि ईडी कडून चौकशी होऊन त्याची अवैध संपत्ती जप्त करण्यात यावी. गृहमंत्री ह्यांनी आरोपी अटक करून कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत तातडीने कार्यवाही न झाल्यास जिल्हाभर युवा आघाडी आंदोलन करेल. हा हल्ला मुंबई अध्यक्ष ह्यांचे वर नसून आंबेडकर भवन वर झालेला हल्ला आहे, आंबेडकरी जनतेत तीव्र संताप असून तातडीने कार्यवाही न झाल्यास वंचित बहूजन युवा आघाडी कडून ह्याचे तीव्र जनआंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला. निवेदन देताना वंचित बहुजन युवा आघाडीचे सिद्धांत पुणेकर, हर्षवर्धन कोठारकर, सिद्धार्थ गणवीर, नकुल कांबळे, कबीर घोनमोडे, वैभव रामटेके, महिला आघाडीचे शहराध्यक्ष तनुजा रायपुरे, मोनाली पाटील, वैशाली साव व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या