प्रतिनिधीचित्रा न्युज
धुळे :-लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या २६ जून जयंतीचे अवचित्य साधन लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज "समाजभूषण पुरस्कार" आयोजन रायबा बहुउद्देशीय संस्था द्वारे करण्यात आले आहे.
तरी लोक राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी महाराष्ट्रात शिक्षण, कृषी, आरोग्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक अशा क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र शाहू -फुले- आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. त्यांच्या या कार्याची जनजागृती व्हावी व प्रचार प्रसार व्हावा यासाठी समाजातील विविध क्षेत्रातील उदाहरण कृषी, शिक्षण, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, पर्यावरण, व्यापार, उद्योग, आरोग्य अशा अनेक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला रायबा बहुउद्देशीय संस्थाद्वारे समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामागील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची जनजागृती व्हावी आणि समाजातील नागरिकांना त्याच्या कार्याची माहिती मिळावी हा यामागे उद्देश आहे. तरी पुरस्कार साठी नामांकन पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी अधिक माहितीसाठी मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मोबाईल क्रमांक ९८८११९४८१६ यावर संपर्क करून अधिक माहिती आपण प्राप्त करू शकतात. सदर पुरस्कार सोहळा धुळे येथे भव्य -दिव्य पध्दतीने विशेष प्रसिद्ध व्यक्तींच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.


0 टिप्पण्या