प्रतिनिधी चित्रा न्युज
पुणे - डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती BANRF - 2019 - 20 महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठात संशोधन करणाऱ्या अनुसूचित जातीतील एम फीलच्या पात्र 172 संशोधक विद्यार्थ्यांना एम फील, पी.एचडी नियमित पाच वर्षे अधिछात्रवृत्ती मिळावी म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अर्थात बार्टी येथे गेल्या चार दिवसापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष 2019 - 20 मध्ये महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात अनुसूचित जातीतील एम.फिल करणाऱ्या पात्र 172 विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या माध्यमातून बीएएनआरएफ 2019 - 20 अधिछात्रवृती देण्यात आली होती. तीच अधीछात्रवृत्ती युजीसीच्या नियमाप्रमाणे एम फील, पीएचडी अशी नियमित पाच वर्षे देण्यात येते. त्याचप्रमाणे बार्टी या संशोधन संस्थेच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या सारथी व महाजोती या संशोधन संस्था देखील सशोधन करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना एम फील, पीएच.डी अशी नियमित सलग पाच वर्षे अधीछात्रवती देतात.
त्याचप्रमाणे बार्टी संस्थेने देखील सन 2018 च्या एम फिल संशोधक विद्यार्थ्यांना एम फील पीच डी नियमित पाच वर्ष अधीछात्रवृति देण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे . परंतु बार्टी ही संस्था सन 2019 - २० एम फील संशोधक विद्यार्थ्यांना नियमित एम फील पीच डी अधिछात्रवृत्ती पासून वंचित ठेवत आहे .अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थ्यावर अन्याय करत आहे . या संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत डॉ शहाजी चंदनशिवे राज्य समन्वयक फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्य आणि चंद्रकांत दादा लोंढे जिल्हाध्यक्ष पिंपरी चिंचवड वंचित बहुजन युवा आघाडी यांनी पाठिंबा दिला. सदर विद्यार्थ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मागण्या कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी राज्यातील अनेक संशोधक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते. चार दिवसापासून या विद्यार्थ्यांना एकाही अधिकाऱ्याने विचारले नाही. त्यांची चौकशी केली नाही. या आंदोलनांमध्ये विद्यार्थिनींचाही सहभाग आहे. त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची कोणीही सोय केलीली नाही. तेव्हा सहानुभूती म्हणून चंद्रकांत दादा लोंढे व डॉ शहाजी चंदनशिवे यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना चहा बिस्किट, केळी इत्यादी वस्तू देऊन त्यांना आधार दिला.
या निवेदनाची प्रत महासंचालक डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , गृहमंत्री महाराष्ट्र राज्य , जिल्हाधिकारी पुणे यांना पाठवण्यात आलेल्या आहेत.


0 टिप्पण्या