प्रतिनिधी चित्रा न्युज
भंडारा :- इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी राज्य शासनाकडून परदेशी शिष्यवृत्ती दिली जाते.मात्र या शिष्यवृत्ती निकषात असे आढळले की,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला असून खुल्या प्रवर्गासाठी उत्पन्न मर्यादा २० लाख,तर ओबीसींसाठी ८ लाख रुपये उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आले आहे.ही बाब ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे निकष ओबीसींना लागू करावे अशी मागणी ओबीसीं क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य जिल्हा भंडारा यांनी केली.ओबीसी विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्ती संदर्भातील व्यथा मांडल्या आहेत.परदेशी शंभर क्रमवारीतील विद्यापीठासाठी एससीसाठी उत्पन्न मर्यादाच नाही मग ती ओबीसींना तशीच लागू का करीत नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे.राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयांनी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात विजाभज,ईमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेश शिष्यवृत्तीसाठी केवळ ५० विद्यार्थ्यांसाठी जाहिरात काढली आहे.त्यात उत्पन्नाची मर्यादा ही फक्त आठ लाख वार्षिक एवढी ठेवलेली आहे तर शासनाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अशाच शिष्यवृत्तीसाठी २० लाख उत्पन्न मर्यादा ठेवलेली आहे.त्यामुळे ओबीसींसाठी उत्पन्न मर्यादा २० लाख करण्यात यावी अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य जिल्हा भंडारा यांनी केली आहे.
अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी सोपविण्यात आले आहे.या प्रसंगी अध्यक्ष संजय मते,संयोजक जीवन भजनकर,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडू बोपचे,महिलाध्यक्ष शोभा बावनकर,तालुकाध्यक्ष सुधीर सार्वे,धनराज साठवणे,पृथ्वीराज तांडेकर,कामेश लेंडे, कु.कल्याणी मते,कु.यश्ववि पंचबुद्धे,याशिका घोडीचोर,आशुतोष दृगकर,
प्रतिक्रिया
शिष्यवृत्ती क्रमवारीतही तफावत
ओबीसी विभागाने फक्त २०० क्रमवारीत परदेशी विद्यापीठांसाठी ही शिष्यवृत्ती पात्र असल्याची अट लादली आहे.परंतु एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी मात्र ३०० क्रमवारीतील विद्यापीठे ही पात्र ठरविलेली आहे. तीच अट व सवलत ओबीसींनासुद्धा का नाही ? असा प्रश्न ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष उपस्थित केला आहे.
परदेश शिष्यवृत्तीत ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे.ही बाब मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व ओबीसी विभाग मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.ओबीसी विद्यार्थ्यांची उत्पन्न मर्यादा २० लाख रुपये असणे काळाची गरज आहे.असे मत ओबीसी क्रांती मोर्चा शेतकरी संघटनेचे बंडू बोपचे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या