Ticker

6/recent/ticker-posts

वाडेगाव येथे वंचित बहुजन आघाडीकडून एक दिवसीय धरणे आदोलन


 कांदा पिकाला हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्या !

प्रतिनिधी चित्रा न्युज
अकोला -  वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, ओबीसी नेते गोपाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत शासनाने द्यावी, या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील टि पॉईंट येथे आयोजित करण्यात आले होते. असमानी संकट व त्यांनतर कांद्याला मिळत असलेला मातीमोल भावाने शेतकरी हा मोठ्या आशेने शासनाची मदत मिळेल म्हणून बघत असतांना शासन ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याने आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी आपला कांदा हा रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध केला.  
 
या धरणे आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, ओबीसी नेते गोपाल राऊत, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संगीताताई अढावू, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर, मा. जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान जि. प. सदस्य सौ. पुष्पाताई इंगळे, मनपा गटनेते गजानन गवई, सह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, ओबीसी नेते किशोर वानखडे, जिल्हा परिषद महिला बालकल्याण  सभापती रिझवाना  परवीन ,शिक्षण सभापती माया नाईक, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर,दिनकर खंडारे, जिल्हा उपाध्यक्ष सौ. कविता राठोड, गौतम शिरसाट, गुलाब उमाळे, पातुर तालुकाध्यक्ष डॉ ओमप्रकाश धर्माळ, रूग्णसेवक नितीनभाऊ सपकाळ, गजानन दांदळे, संजय बावणे, सिद्धार्थ वानखडे मामा, सुमेध खंडारे, अर्जुन टप्पे,  अविनाश खंडारे, पंचायत समिती सदस्य अफसर खान, पंचायत समिती सदस्य अनिल राठोड, बाळापूरचे  महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा डांगे, तालुका महासचिव  जाहिदा बी,  माजी सभापती मायताई लोध, शामलाल लोध, दयाराम डोंगरे, देवांनद अंभोरे, गौतम सिरसाट,जितेंद्र डोंगरे, बाबा खान, सादिक मण्यार ,समीर टेलर,भाष्कर तायडे,सैय्यद सादिक,रामकृष्ण तायडे,शेख मुक्तार, गजानन डोंगरे,किशोर अवचार,दिनेश धाडसे, विक्की पाटील, सिद्धार्थ वानखडे, सरपंच दिपाली सरदार, विजय पातोडे, मनोज पातोडे,सावदेकर गुरुजी,नागेश डोंगरे,सुदर्शन सिरसाट,मंगेश तायडे,बाळापूर तालुका प्रसिद्धी प्रमुख सुमेद अंभोरे, रामकृष्ण तायडे, सादिक ठेकेदार, सावदेकर गुरूजी, गजानन डोंगरे रामकृष्ण तावडे, सुजित तेलगोटे, एकदिवसीय धरणे अदोलनचे संचालन गजानन गवई, प्रास्ताविक देवानंद अंभोरे यांनी केले तर आभार संजय बावणे यांनी केले आहे. या धरणेला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बाळापूर व पातुर तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या